कोइमतूर येथे हवाई दलाचे अठरावे स्क्वाड्रन कार्यान्वित

tejas
tejas

चेन्नई

भारतीय हवाई दलाचे १८ वे स्क्वाड्रन तमिळनाडूच्या कोइमतूर येथे येत्या २७ मेपासून सुरू होत असून या तुकडीत चौथ्या आवृत्तीच्या हलक्या वजनाचे लढाउ विमान एलसीए तेजसचा समावेश असणार आहे. भारतीय हवाई दलाचे हवाईदलप्रमुख एअरमार्शल आरकेएस भदोरिया हे या फ्लाइंग बुलेटचे उड्डाण करुन अठराव्या स्क्वाड्रनचे उदघाटन करतील.हा कार्यक्रम सुलुर येथील एअरफोर्स स्टेशन येथे होईल.
संरक्षण मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले की, तेजसचा समावेश असणारे हे देशातील दुसरे स्क्वाड्रन असेल. यापूर्वी ४५ व्या स्क्वाड्रनमध्ये तेजसचा समावेश होता.१८ व्या स्क्वाड्रनची स्थापना १९६५ मध्ये केली होती. तत्पूर्वी या स्क्वाड्रनने मिग-२७ चे संचलन केले होते. या स्क्वाड्रनचे ब्रिदवाक्य ‘तीव्र आणि निर्भय‘ असे आहे. या स्क्वाड्रनला याचवर्षी एक एप्रिलला सुलूर एअरफोर्स स्टेशनवर पुन्हा कार्यान्वित केले होते. या स्क्वाड्रनने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील १९७१ च्या युद्धात सहभाग घेतला होता. या स्क्वाड्रनचे फ्लाइंग ऑफिसर निर्मलजित सिंग सेखो यांना मरणोत्तर परमवीर चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. एवढेच नाही तर श्रीनगर येथे पहिले ग्राऊंड करुन त्याचे सचलनही याच स्क्वाड्रनने केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com