Youtube
YoutubeDainik Gomantak

7 भारतीय, 1 पाकिस्तानी यूट्यूब-न्यूज चॅनेल ब्लॉक करण्याचे सरकारचे आदेश

7 भारतीय, 1 पाकिस्तानी यूट्यूब-न्यूज चॅनेल ब्लॉक करण्याचे सरकारने आदेश दिले आहे.

भारताच्या सुरक्षेवर परिणाम करणारा मजकूर पोस्ट केल्याबद्दल माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (I&B) 7 YouTubeचॅनेलवर बंदी घातली आहे. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा, कायदा आणि सुव्यवस्था आणि परराष्ट्र संबंधांवर परिणाम करणारी सामग्री दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. कारवाई करण्यात आलेल्या चॅनल्समध्ये 1 पाकिस्तानी तर, 7 भारतीय यूट्यूब चॅनलचा समावेश आहे. या चॅनल्सला 118 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. 21 डिसेंबरपासून भारताविरोधात मजकूर प्रसारित करणाऱ्या 102 यू ट्यूब चॅनेल ब्लॉक करण्यात आले आहेत

या सर्व चॅनल्सवर IT नियम 2021 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ब्लॉक यूट्यूब चॅनेलवर 114 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. तर या चॅनेलचे 85 लाख 73 हजार सदस्य आहेत. 21 डिसेंबरपासून भारताविरोधात (India) मजकूर प्रसारित करणाऱ्या 102 यू ट्यूब चॅनेल ब्लॉक करण्यात आले आहेत.

यापूर्वी 25 एप्रिल 2022 रोजी मोदी सरकारने 16 यूट्यूब चॅनेल ब्लॉक केले होते. त्या चॅनेल्समध्ये 10 भारतीय आणि 6 पाकिस्तान आधारित चॅनेल होते. हे चॅनेल आयटी नियम 2021 अंतर्गत ब्लॉक करण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com