नामवंत लेखिका हेता पंडित आणि शीला जयवंत यांचे गोव्यात व्याख्याने

येत्या रविवारी 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 वाजता व्याख्यान पिळर्ण येथील ‘म्युझीयम ऑफ गोवा’ (मोग) मध्ये आयोजित करण्यात आला आहे
Lectures
Lectures Dainik Gomantak

येत्या रविवारी 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 वाजता दोन नामवंत लेखिका हेता पंडित आणि शीला जयवंत यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम पिळर्ण येथील ‘म्युझीयम ऑफ गोवा’ (मोग) मध्ये आयोजित करण्यात आला आहे. हेता पंडित या ‘भाषांतर की अर्थात्मक अनुवाद’ (इंटरप्रिटेशन) या विषयावर तर शीला जयवंत ह्या ‘स्वतंत्र अनुवादक असण्यामागचे अनुभव आणि अडचणी’ या विषयावर बोलतील.

साळगांवमध्ये राहणाऱ्या हेता पंडित यांनी जाहिरात (Advertising) आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात काम केलेले आहे. ‘चिपांझी’ वर संशोधन करणाऱ्या जेन गुडॉल यांच्या बरोबरही त्यांनी काम केले आहे. मुंबईत असताना वारसास्थळांबद्दल जागरुकता आणि कृती संबंधातल्या चळवळीत त्या अग्रेसर होत्या. गोव्यात स्थायीक झाल्यानंतर 2000 मध्ये ‘गोवा हेरिटेज एक्शन ग्रूप’ ची स्थापना करण्यात त्यांचा सहभाग होता. ही संस्था गोव्याच्या (Goa) नैसर्गिक आणि संस्कृतिक (Culture) वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी कटिबद्ध’ आहे.

Lectures
‘टोटेम',श्रद्धा कॅमेरा आणि बरेच काही..

1983 मध्ये लिहायला प्रारंभ केलेल्या शीला योनी ‘इव्हस वीकली’ आणि ‘वुमन्स ईरा’ साठी वैशिष्ट्यपूर्ण मुलाखती घेतल्या आणि इतर साहित्याचेही लिखाण केले. ‘इंडीयन एक्स्प्रेस आणि ‘न्यूजटाईम’ साठी त्यांनी विनोदी लेखनही केले आहे. ‘रिडर्स डायजेस्ट’, ‘वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड’, ‘सेव्ही’, ‘एले’ इत्यादी प्रतिष्ठित प्रकाशनासाठी तिने लेखन केले आहे. तिने सहा पुस्तकांचे मराठी- इंग्रजी भाषांतर केलेले आहे. ती ‘गोवा राईटर्स ग्रुप’ ची सदस्या आहे, जो लेखन कौशल्ये वाढवण्यात मदत करतो आणि लेखक व लेखनाला प्रोत्साहन देतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com