Fishing In Monsoon: लागली समाधी

विचारणारा आणि दाखवणारा यांच्या चेहऱ्यावर त्यावेळी एकतर प्रफुल्लित हास्य तरी उमटलेले असते किंवा नशिबाला दोष देणारी उदासीनता.
Fishing In Monsoon
Fishing In MonsoonDainik Gomantak

Fishing In Monsoon यंदाच्या पावसाळ्यात, दोन दिवसापूर्वी झालेल्या पहिल्या जोरदार पावसानंतर गावातील ओढ्या नाल्यांना जान आली असेल. ओल्या पण प्रसन्न वातावरणात गावच्या साकवावर जाऊन, तिथे गळ टाकून समाधीस्थ होत, संथ सुखात डुंबून गेलेल्या माणसांची अशी चित्रे आता जागोजागी दिसतील.

‘लागला रे किदे?’, बाजूने जाणाऱ्या कुणीतरी हळू आवाजात विचारलेल्या प्रश्नाला, कडेला ठेवलेली पिशवी उघडून किंवा प्लास्टिकचे बकेट आडवे करून न शब्द उच्चारता उत्तर दिले जाते.

विचारणारा आणि दाखवणारा यांच्या चेहऱ्यावर त्यावेळी एकतर प्रफुल्लित हास्य तरी उमटलेले असते किंवा नशिबाला दोष देणारी उदासीनता.

पण त्याने पाण्यात टाकलेला गळ मात्र तिथल्या खेळाळणाऱ्या पाण्यात, विचलित न होता, आशेवर आपली धार परजत मायावीपणे लकाकतच असतो.

मासे गळाला लागो वा न लागो पण एरवी तिखटजाळ असलेला एखादा गोमंतकीय अशा जागी मात्र संयमाची परीक्षा देत, तासनतास डोळे एकटक पाण्याकडे लावून खालच्या मानेने नम्र झालेला दिसतो.

शनिवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर छायाचित्रकार मयंका हळर्णकर सावंत हिने आखाडा- सांतइस्तेव्ह येथे टिपलेले हे छायाचित्र.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com