गोव्यातील झुआरी पुलाचा दिलीप बिल्डकॉनला फायदा, काम पूर्णत्वाकडे जाताच शेअर्समध्ये 8 टक्के वाढ

दिलीप बिल्डकॉन लिमिटेड कंपनी नवीन झुआरी पुलाचे काम करत आहे.
New Zuari Bridge
New Zuari BridgeDainik Gomantak

Dilip Buildcon Company Shares: गोव्यातील झुआरी नदी पूल बांधला जात आहे, पुलाची एक लाईन सुरु करण्यात आली असून, लवकरच दुसरी लाईन सुरु होणार आहे. पुलाची दुसरी लेन जानेवारी 2024 मध्ये सुरु होण्याची शक्यता आहे.

दिलीप बिल्डकॉन लिमिटेड कंपनी नवीन झुआरी पुलाचे काम करत आहे. दरम्यान, पुलाचे काम पूर्णत्वाकडे जात असताना कंपनीच्या शेअर्समध्ये 8 टक्के वाढ झाली असून, ही मागील 22 महिन्यांतील उच्चांकी वाढ आहे.

दिलीप बिल्डकॉनचा शेअर 7.61 टक्के वाढून प्रत्येकी 404.35 रुपये झाला आहे. वर्ष ते तारीख तुलनेत कंपनीचा शेअर 85.67 टक्के वाढला आहे. तर, दिवसातील एकूण ट्रेड व्हॉल्यूम त्याच्या 30 दिवसांच्या सरासरीच्या 8.6 पट होता.

ब्लूमबर्गच्या डेटानुसार, दिलीप बिल्डकॉनचा मागोवा घेणाऱ्या सहा विश्लेषकांपैकी चार विश्लेषक स्टॉक 'बाय' करण्यावर आणि दोन 'होल्ड' करण्याची शिफारस करतात.

नवीन झुआरी पुलाचे काम एप्रिल 2019 मध्ये पूर्ण होणार होते. मात्र, पुलाचे काम वारंवार लांबणीवर पडत गेले. दरम्यान, आता पुलाचे काम येत्या 10 डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच जानेवारीमध्ये पुलाच्या दुसऱ्या लेनचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता आहे.

पुलाची देखरेख ही अगोदरची आठ वर्षे दिलीप बिल्डकॉन कंपनी करेल तर नंतर हा पूल गोवा सार्वजनिक बांधकाम खात्याकडे सोपविण्यात येणार आहे. नवीन झुआरी पुलासाठी सुमारे 200 हून अधिक केबल्सचा वापर करण्यात आला आहे. या पुलाचे आयुर्मान हे 120 वर्षे असेल असे सांगण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com