Kangana Ranauts Twitter account was suspended for making controversial tweets on social media
Kangana Ranauts Twitter account was suspended for making controversial tweets on social media 
मनोरंजन

कंगना रणावतच्या ट्विटर आकाऊंट ब्लॉकनंतर 'संस्पडेंड' हॅशटॅगने ट्विटरवर घातला धुमाकुळ

गोमंन्तक वृत्तसेवा

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा एकदा देशभरात खळबळ उडवली आहे. आणि त्यातच अभिनेत्री कंगना रणानत(Kangana Ranaut) ची एक मोठ बातमी पुढे येत आहे. कंगनाने सोशल मीडियावर एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. आणि त्या पोस्ट मधील वादग्रस्त विधानाने तीला पुन्हा ट्रोल केलं जात आहे. अशातच ट्विटरनेही(Twitter) अकाउंट ब्लॉक केले आहे. त्यानंतर सोशल मिडियावर संस्पेंडेड(suspended) असा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. (Kangana Ranauts Twitter account was suspended for making controversial tweets on social media)

कंगनाने केलेल्या वादग्रस्त ट्विट बद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. कोरोनाची दुसरी लाट सर्वत्र मोठ्या प्रमाणात पसरत आहे. अशातच बॉलिवूड अभिनेत्री कंगनाने सोशल मीडियावर ऑक्सिजनच्या शॉर्टेज बद्दल लोकांना भाषण दिले. ज्यावर युजर्सनी कंगनाला ट्रोल करून चांगलिच खरी खोटी सुनावली आहे.

दरम्यान कंगनाने पश्चिम बंगालच्या निवडणूकीवरही आपले मत व्यक्त केले आहे. ज्यामुळे ट्विटरने तीच्यावर कारवाई केली आहे, पश्चिम बंगाल आणि स्थानिक नागरिकांची अवहेलना करणारे ट्विट केल्याने पश्चिम बंगाल जनतेच्या भावना दुखावल्याचा मुद्दा उपस्थित करत तिच्याविरोधात कोलकाता पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

"बांगलादेशी आणि रोहिंग्या हेच ममता बॅनर्जी यांची ताकद आहेत. इथे हिंदूंची संख्या जास्त नाही हे स्पष्ट होत आहे. आणि माहितीनुसार बंगाली मुस्लिम हे सर्वात गरीब आणि चांगले आहेत, देशात आणखी एक काश्मीर आकारास येत आहे", असे ट्विट तिने ट्विटमध्ये लिहिले होते. कंगनाने आणखी एका ट्विटच्या माध्यमातून पश्चिम बंगालमध्ये भाजपला कशा प्रकारे यश मिळाले याबाबत ट्विट करत देशातील सत्ताधारी पक्षाचे कौतुक केले होते. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Goa Today's Live News: मतदानाचा उच्चांक भाजपला घरी पाठविण्यासाठी!

Air India Express: एअर इंडिया एक्सप्रेसची गोव्याला येणारी फ्लाईट रद्द, दिल्ली विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ Video

Delhi Excise Policy Case: केजरीवाल विरुद्ध आमच्याकडे पुरावे, राजकारणाशी आमचा संबंध नाही; ED

Externment Orders: पास्टर डॉम्निक डिसोझा आणि जुआन मास्करारेन्हसला दिलासा; तडीपारीचा आदेश रद्द

SCROLL FOR NEXT