Sporting Club
Sporting Club  Dainik Gomantak
क्रीडा

स्पोर्टिंग क्लबच्या आशेवर पाणी

Dainik Gomantak

कोरोना विषाणू महामारीमुळे सद्यःस्थितीत २०१९-२० फुटबॉल मोसम पुढे खेळविणे शक्य नसल्याने गोवा फुटबॉल असोसिएशनचे (जीएफए) अध्यक्ष चर्चिल आलेमाव यांनी नव्या मोसमाच्या तयारीस लागण्याचे ठरविले आहे.

मागील मोसम अर्ध्यावरच राहिल्याने स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाच्या आशेवर पाणी पडले आहे.

राज्यात सध्या कोविड-१९चा उद्रेक आहे. त्यामुळे २०१९-२० मोसमातील सर्व फुटबॉल स्पर्धा अर्धवटावस्थेत राहिल्या. या कारणास्तव प्रो-लीग स्पर्धेलाही विजेता नसेल. प्रो-लीग विजेतेपदासाठी स्पोर्टिंग क्लब द गोवा संघ प्रमुख दावेदार होता. स्पर्धा खंडित झाली तेव्हा त्यांच्या खाती सर्वाधिक ४४ गुण होते, पण त्यांचे विजेतेपद निश्चित झाले नव्हते.

चर्चिल ब्रदर्सचे पाच सामने बाकी होते व त्यांच्या खाती ३७ गुण होते. जीएफए अध्यक्षांचा संघही विजेतेपदाच्या शर्यतीत कायम होता, परिणामी प्रो-लीग विजेता जाहीर करण्यात आलेला नाही.

जीएफएने संबंधितांना पत्र पाठवून २०१९-२० मोसम संपवत असल्याचे कळविले आहे. कोविड-१९मुळे गोव्यात २० मार्च २०२० नंतर एकही स्पर्धात्मक फुटबॉल सामना झालेला नाही. कोरोना विषाणूचे गोव्यातील रुग्ण वाढत असल्याने जीएफएला सामने खेळविणे अशक्य ठरले आहे.

परिणामी मागील मोसम आटोपता घ्यावा लागला. लवकरच २०२०-२१ मोसमाची प्रक्रिया जीएफएकडून हाती घेतली जाईल. व्यवस्थापकीय समिती बैठकीविना मागील मोसम आटोपता घेणे जीएफएच्या काही पदाधिकाऱ्यांना पसंत पडलेले नाही. त्यात उपाध्यक्ष अँथनी पांगो आघाडीवर आहेत.

गोव्यातील अव्वल साखळी फुटबॉल स्पर्धेचे १९९८ साली प्रो-लीग असे नामकरण झाले. तेव्हापासून स्पोर्टिंग क्लबने ही स्पर्धा चार वेळा जिंकली आहे.

चर्चिल ब्रदर्सही चार वेळा या स्पर्धेत विजेता ठरला आहे. प्रो-लीग स्पर्धेत साळगावकर एफसीने सर्वाधिक सात वेळा, तर धेंपो स्पोर्टस क्लबने पाच वेळा विजेतेपद पटकाविले आहे. एफसी गोवा संघ एकवेळ विजेता ठरला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Blue Origin Flight: ऐतिहासिक! राकेश शर्मानंतर गोपीचंद थोटाकुरा ठरले अंतराळात जाणारे दुसरे भारतीय

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

SCROLL FOR NEXT