football 1.jpg
football 1.jpg 
क्रीडा

Indian Super League: आयएसएल मैदानावर भारतीय फुटबॉलपटूत वाढ

गोमंन्तक वृत्तसेवा

पणजी : इंडियन सुपर लीग (आयएसएल) (ISL) फुटबॉल (Football) स्पर्धेच्या आगामी मोसमात मैदानावरील भारतीय फुटबॉलपटूंच्या संख्येत वाढ होईल. सामन्यात प्रत्येक संघात कमीत कमी सात भारतीय फुटबॉलपटू निवडणे बंधनकारक करण्यात आले असून परदेशी खेळाडूंची संख्या चारपर्यंत घटली आहे.

या स्पर्धेचे आयोजक फुटबॉल स्पोर्टस डेव्हलपमेंट लिमिटडे(Football Sports Development Limited) (एफएसडीएल) यांनी नवी नियमावली मंगळवारी जारी केली. यापूर्वीच्या आयएसएल स्पर्धेच्या मोसमात सामन्यातील प्रत्येक संघ कमीत कमी सहा भारतीय खेळाडू निवडू शकत असे. स्पर्धेच्या आगामी आठव्या मोसमापासून आयएसएल सामन्यात प्रत्येक संघात सात भारतीय आणि चार परदेशी फुटबॉलपटू असतील. (Indian Super League Rise of Indian footballers on the ISL ground)

भारतीयांना प्राधान्य

आयएसएल स्पर्धेस 2014 साली सुरवात झाली. स्पर्धेच्या पहिल्याच मोसमात अंतिम अकरा सदस्यीय संघात सहा परदेशी व पाच भारतीय फुटबॉलपटू निवडण्याची मुभा होती. त्यानंतर भारतीय फुटबॉलचा विकास नजरेसमोर ठेवून 2017-18 मोसमात संघ निवड नियमावली बदलण्यात आली. त्या मोसमापासून सहा भारतीय व पाच परदेशी फुटबॉलपटू असे समीकरण निश्चित करण्यात आले. आता 2021-22 मोसमापासून संघात आणखी एक भारतीय खेळाडू वाढेल.

एएफसी नियमाचा परिणाम

आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) (AFC) क्लब स्पर्धा नियमावलीनुसार प्रत्येक संघातर्फे सामन्यात चार परदेशी फुटबॉलपटू खेळणे आवश्यक आहे. या नियमानुसार, गेल्या एप्रिलमध्ये एफसी गोवा संघ एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत खेळला होता. आगामी आयएसएल मोसमासाठी प्रत्येक संघ कमाल सहा परदेशी खेळाडू करारबद्ध करू शकतील, त्यापैकी एक खेळाडू एएफसी सदस्य देशाचा असेल. याशिवाय क्लबना परदेशी मार्की खेळाडू करारबद्ध करण्याची मुभा असेल.

चार डेव्हलपमेंट खेळाडू

नव्या आयएसएल मोसमापासून प्रत्येक क्लबला दोनऐवजी चार भारतीय डेव्हलपमेंट (विकासात्मक) फुटबॉलपटू करारबद्ध करावे लागतील, त्यापैकी दोघे जण सामन्यात संघातून खेळतील. प्रत्येक संघाची कमाल खेळाडू मर्यादा ३५ असेल, त्यात तिघे जण गोलरक्षक असतील. नोंदणीकृत 35 खेळाडूंपैकी भारतीय खेळाडू जायबंदी झाल्यास बदली खेळाडू निवडता येईल. तसेच 2021-22 मोसमात प्रत्येक क्लबसाठी खेळाडू मानधन मर्यादा 16.5 कोटी रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Blue Origin Flight: ऐतिहासिक! राकेश शर्मानंतर गोपीचंद थोटाकुरा ठरले अंतराळात जाणारे दुसरे भारतीय

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

SCROLL FOR NEXT