trafic.jpg
trafic.jpg 
गोवा

म्‍हापशात संचारबंदीतही वाहतूक कोंडी

तुषार टोपले

म्हापसा : म्हापसा (Mapusa) मारुती मंदिर ते न्यायालय चौकपर्यंत मागील पंधरा दिवसांपासून सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत दररोज वाहतुकीची कोंडी (Traffic jam) निर्माण होत आहे. ही वाहतुकीची कोंडी सोडविण्यास वाहतूक पोलिस व म्हापसा पोलिसांना (police) अपयश आले आहे. वाहतूक सुरळीत करण्यासंदर्भात पोलिसांकडे नियोजन शून्य आहे. राज्यात संचारबंदी (Curfew) आहे की नाही, असा प्रश्‍न नागरिकांना पडत आहे. म्हापसा शहराच्या अनेक भागात वाहनांची कोंडी होताना दिसत आहे. सिरसाट बिल्डिंग ते कोमुनिदाद घरपर्यंत सकाळच्या सत्रात वाहनाच्या रांगा लागतात. पण, हा प्रश्‍न सोडविण्याचे सौजन्य कुणी दाखवत नाही. अशाच प्रकारे खोर्ली सिम ते खोर्लीपर्यंत रस्ता वाहनाच्या रांगा लागत असल्यामुळे वाहतूक खोळंबून पडते.(Traffic jam in Mapusa during lockdown)

पोलिसांचे दंडात्‍मक कारवाईकडे लक्ष 

वाहनाची कोंडी निर्माण होते त्याठिकाणी वाहतूक पोलिस, पोलिस व आरटीओ (RTO) गर्दी करून वाहनचालकाना दंड देण्यास मग्न राहतात. न्यायालयाजवळ, म्हापसा अर्बन जवळ, खोर्ली भागात ट्रक, टेम्‍पो, बस अशा मोठ्या वाहनांना पोलिस रस्त्याच्या मध्यभागी अडवून वाहतूक अडवून ठेवतात व कारवाई (Action) करतात. तसेच अनेक शहराच्या आतील रस्त्यावर लपून राहत दुचाकी किंवा चारचाकी वाहनाना दंड दिला जातो. कोरोनामुळे काही नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. काहींना पगार मिळत नाही. काहींचे व्यवसाय चालत नाही. अशा नागरिकांच्या खिशात 100 रुपये असणे सुद्धा अवघड झाले आहे. काहींच्या घरामध्ये उपासमारी चालू आहे. अशा कठीण प्रसंगात भाजप सरकार पोलिसांच्या माध्यमातून जनतेची सतवणूक करीत आहेत, असा आरोप त्रस्त नागरिक व वाहनचालक करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

Goa Today's Live News: चारशे नव्हे दोनशे पार देखील भाजपला जड जाणार - शशी थरुर

United Nations मध्ये भारताचा अमेरिका आणि इस्रायलला दणका; स्वतंत्र पॅलेस्टाईनच्या मागणीला दिला पाठिंबा

SCROLL FOR NEXT