Accident Death In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Death: वेगाचे अंदाज चुकले, तिघे जीवाला मुकले

दैनिक गोमन्तक

Goa Accident Death: शिर्ली - धर्मापूर, सुकूर - पर्वरी आणि सुर्ल - डिचोली अशा तीन ठिकाणी आज झालेल्या अपघातांत तिघांचा मृत्यू झाला. सुर्ल येथील स्वयं अपघातात सुर्ल पंचायतीचे माजी पंच सदस्य प्रशांत रघुनाथ नाईक गावकर (वय ५९) यांचे निधन झाले. सुर्ल येथील दुग्ध सोसायटीजवळच रस्त्यावर म्हशी आडव्या आल्याने त्यांना हा अपघात झाला.

शिर्ली-धर्मापूर येथे रविवारी रात्री कारचालकाचा रस्त्याचा अंदाज चुकल्याने भरधाव कारची झाडाला धडक बसून कारचालक सत्त्या तोमर (वय २९) याचा मृत्यू झाला. भरधाव वेगात गाडी हाकल्याने वाहनावरील त्याचे नियंत्रण जाऊन हा अपघात घडला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

चालक सत्त्या तोमर हा मडगावातील ‘चार्ली टेलर्स’ आस्थापनाच्या मालकांचा मुलगा आहे. त्याला याआधी ऑगस्ट २०२० मध्ये दुचाकी चोरी प्रकरणात मडगाव पोलिसांनी अटक केली होती व त्याच्याकडून चोरीच्या चार दुचाक्याही जप्त केल्या होत्या अशी माहिती प्राप्त झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरवडे - नावेली येथील रहिवासी सत्त्या राजकुमार तोमर हा युवक चारचाकीने रात्री मडगावहून कुंकळ्ळीच्या दिशेने जात होता. रात्री १.१५ वाजता रस्त्याचा अंदाज न आल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटला व गाडी रस्त्याशेजारील झाडावर जाऊन आदळली. या अपघातात तो गंभीर जखमी झाली व रक्तस्रावही झाला. त्याला उपचारासाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

सुकूर-पर्वरी येथील दोन दुचाकी वाहनांमध्‍ये झालेल्‍या अपघातात राहुल खडपे याचा जागीच मृत्‍यू झाला, तर, दुसरा दुचाकीस्‍वार गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी त्‍याला तातडीने इस्‍पितळात दाखल करण्‍यात आले आहे. पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला असून, अधिक तपास सुरू आहे.

म्हशीला ठोकर: सुर्लच्या माजी पंचाचा मृत्यू

सुर्ल येथे रस्त्यावर अचानक म्हशी आडव्या आल्याने त्यांना ठोकर बसून झालेल्या स्वयंअपघातात गावकरवाडा - सुर्ल येथील प्रशांत रघुनाथ नाईक गावकर (वय ५९) यांचा मृत्यू झाला. जीए - ०४ - एन - १३८३ या क्रमांकाच्या दुचाकीला झालेल्या स्वयंअपघातात दुचाकीस्वार प्रशांत गंभीर जखमी झाले. उपचारार्थ त्यांना गोमेकॉत नेण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. या अपघात प्रकरणी डिचोलीचे पोलिस उपनिरीक्षक विराज धाऊसकर पुढील तपास करीत आहेत. प्रशांत नाईक गावकर हे विद्यमान पंच सदस्य सुचिता गावकर यांचे पती होत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा राजभाषा कायद्यात मराठी नको म्हणाणाऱ्या दामोदर मावजो यांची अभिजात दर्जानंतर पहिली प्रतिक्रिया; स्पृश्य - अस्पृश्यतेचा केला उल्लेख

Sand Mining: गोव्यात बांधकामांना आता 'अच्छे दिन' 'मांडवी', 'झुआरी'त रेती उपशास मुभा; दरावरही येणार नियंत्रण

कोने, प्रियोळ येथे भीषण अपघातात एक ठार; दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी 4 अपघात, गोव्यातील ठळक बातम्या

Goa News: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्प्रिंगबोर्ड टॅबलेटचे वाटप

सुभाष वेलिंगकरांना अटक होणार का? गोव्यात कॅथलिक समाज आक्रमक, पोलिस स्थानकांवर निदर्शने

SCROLL FOR NEXT