Start the study of Chhatrapati Shivaji in Goa Sambhaji Raje
Start the study of Chhatrapati Shivaji in Goa Sambhaji Raje 
गोवा

छत्रपती शिवरायांचे अध्यासन गोव्यात सुरू करा : संभाजीराजे

गोमंतक वृत्तसेवा

कोल्हापूर: गोवा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र सुरू करावे, अशी मागणी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे आज निवेदनाद्वारे केली.

विद्यार्थी, अभ्यासकांना त्याचा लाभ होईल, असे त्यांनी सांगितले. गोव्यात जाऊन त्यांनी मुख्यमंत्री सावंत यांची भेट घेतली. रायगड विकास प्राधिकरणाला, गोवा सरकारने पोर्तुगीज कागदपत्रे, पत्रव्यवहार आणि संदर्भग्रंथ याबाबत सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली. गोव्याचे पोर्तुगीज आणि मराठा सत्तांमध्ये नेहमी संघर्ष होता. व्यापारी संबंध देखील होते.

त्यामुळे अनेक पत्रव्यवहार झाले होते. त्यातून रायगड संबंधातील काही नोंदी सापडतील का? हा प्रमुख उद्देश आहे. तसे थेट पुरावे सापडले तर, रायगड संवर्धन कार्यात त्याचा उपयोग होईल, असे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले. पोर्तुगीज, मराठी किंवा इंग्रजी जाणणारे लोक आहेत. 


त्यांच्या माध्यमातून प्राधिकरणाला सर्व ती कागदपत्रे उपलब्ध करून देऊ, असे सांगत मुख्यमंत्री सावंत यांनी  अध्यासन केंद्र स्थापन करण्याबाबत लवकर निर्णय घेऊ, अशी ग्वाही 
दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Goa Today's Live News: मतदानाचा उच्चांक भाजपला घरी पाठविण्यासाठी!

Air India Express: एअर इंडिया एक्सप्रेसची गोव्याला येणारी फ्लाईट रद्द, दिल्ली विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ Video

Delhi Excise Policy Case: केजरीवाल विरुद्ध आमच्याकडे पुरावे, राजकारणाशी आमचा संबंध नाही; ED

Externment Orders: पास्टर डॉम्निक डिसोझा आणि जुआन मास्करारेन्हसला दिलासा; तडीपारीचा आदेश रद्द

SCROLL FOR NEXT