nationalist congress party will be the prior option in the next election says praful patel
nationalist congress party will be the prior option in the next election says praful patel  
गोवा

राज्यात सत्तास्‍थापनेसाठी भाजप आणि काँग्रेसला ‘राष्‍ट्रवादी’ देणार पर्याय

गोमन्तक वृत्तसेवा

पणजी- राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात भाजप आणि काँग्रेसला पर्याय देणार आहे. यासाठी समविचारी पक्षांनाही सोबत घेतले जाणार आहे. या आघाडीवर लोक विश्वास ठेवतील. त्यासाठी येत्या दीड वर्षात पक्षाचे कार्यकर्ते मेहनत घेतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आज येथे पत्रकार परिषदेत नमूद केले. २२ नोव्हेंबरला पणजीत पक्षाच्या कार्यालयाचे उद्‍घाटन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
मुंबईला जाण्यापूर्वी त्यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा, आमदार चर्चिल आलेमाव, युवक प्रदेशाध्यक्ष सतीश नारीयाणी यांच्यासह अन्‍य मान्‍यवर उपस्थित होते. 

पुढे बोलताना ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीची तयारी आम्ही आता करत आहोत. निवडणूक आता केवळ दीड वर्षावर आले आहे. एकेकाळी आमचे चार आमदार व तीन मंत्री होते. मागील निवडणुकीत भाजपच्या पराभवासाठी आम्ही समविचारी पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन केले होते. मात्र दुर्दैवाने काँग्रेसच्या नेत्यांनी सुरवातीला होय म्हटले व नंतर मन बदलले, काँग्रेस स्वतंत्रपणे लढले. त्यामुळे त्यांना १७ आमदार मिळाले. काँग्रेस आमच्यासोबत आले असते तर २१ जणांचे पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करता आले असते. निवडणुकीनंतर काँग्रेसचे १७, गोवा फॉरवर्डचे तीन व आमचा एक आमदार असे सरकार स्थापन करता आले असते. आम्ही काँग्रेसला त्यावेळी पाठिंबा देण्यास तयार होतो. काँग्रेसला २१ आमदारांची यादी करण्यास अपयश आल्याने काँग्रेसचे सरकार आले नाही ही वस्तुस्थिती आहे.

स्‍वबळाच्‍या बाता कितपत योग्‍य?

काँग्रेसचे एका पाठोपाठ एक आमदार भाजपमध्ये गेले आणि आता केवळ ५ आमदार शिल्लक आहे. काँग्रेस आता स्वबळाच्या बाता करत असली तरी भाजपला त्यांना पराभव करणे शक्य होणार का? हा प्रश्न आहे. महाराष्‍ट्रात काँग्रेसचे ४४ तर राष्ट्रवादीचे ५४ आमदार आहेत. आम्ही भाजपला विरोध करण्यासाठी तेथे सर्वांसोबत सरकार स्थापन केले. गोव्यातही सदस्यत्व मोहीम सुरू केली जाईल आणि प्रत्येक मतदारसंघात काम सुरू केले जाईल. महाराष्ट्रातील वरिष्ठ मंत्र्यांना काही भागाचे प्रभारी करून संघटनात्मक काम पुढे नेले जाईल. १८ महिन्यात आम्ही आक्रमक काम करू. मी गेल्या फेब्रुवारीत नव्या कार्यालयाचे उद्‍घाटन करण्यासाठी मी येणार होतो. कोविडमुळे ते पुढे ढकलले आहे. २२ फेब्रुवारीला पणजीत कार्यालय सुरू केले जाईल. 
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

Goa Today's Live News: चारशे नव्हे दोनशे पार देखील भाजपला जड जाणार - शशी थरुर

United Nations मध्ये भारताचा अमेरिका आणि इस्रायलला दणका; स्वतंत्र पॅलेस्टाईनच्या मागणीला दिला पाठिंबा

SCROLL FOR NEXT