Jnanprasarak Mandal College defeated MES Vasant Joshi College by eight wickets
Jnanprasarak Mandal College defeated MES Vasant Joshi College by eight wickets  Dainik Gomantak
गोवा

Womens Cricket Tournament: अंतिम लढतीत ज्ञानप्रसारक महाविद्यालय 'विजयी'; एमईएस महाविद्यालय पराभूत

किशोर पेटकर

Goa University Inter-College Women's Cricket Tournament: आसगाव येथील ज्ञानप्रसारक मंडळ (डीएम्स) महाविद्यालयाने अंतिम लढतीत झुआरी नगरच्या एमईएस वसंत जोशी महाविद्यालयावर आठ विकेट्सने मात करुन गोवा विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला क्रिकेट स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले. अंतिम सामना सोमवारी ताळगाव पठारावरील विद्यापीठ मैदानावर झाला.

दरम्यान, ज्ञानप्रसारक मंडळ महाविद्यालयाने एमईएस महाविद्यालयाचा डाव 124 धावांत गुंडाळल्यानंतर 12.5 षटकांत फक्त दोन विकेट गमावून विजय साकारला. तनया नाईक हिने शानदार नाबाद अर्धशतक नोंदवले. गोवा विद्यापीठाच्या खरेदी विभागातील साहाय्यक कुलसचिव संध्या नेवरेकर, साहाय्यक क्रीडा अधिकारी शैलेंद्र गावकर यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले. विजयी संघाचे रेषा गडेकर, समीक्षा राऊळ, श्रीदेवी नायक, सरिता लमाणी, पूर्वजा राठोड, भूमिका गवंडर, फ्लाविया डायस, रोशनी परब मयेकर, मयुरी कवळेकर, तनया नाईक, सलोनी बांदेकर, पूजा अगलीकेरी, मेताली गवंडरप, संजना मालवणकर, ऊर्वशी गोवेकर, रिदा शेख यांनी प्रतिनिधित्व केले.

संक्षिप्त धावफलक

एमईएस वसंत जोशी महाविद्यालय: 19.5 षटकांत सर्वबाद 124 (हर्षदा कदम 30, अनिशा हरमलकर 21, ऊर्वशी गोवेकर 3-25, समीक्षा राऊत 1-19, मेताली गवंडर 1-21) पराभूत वि. ज्ञानप्रसारक मंडळ महाविद्यालय: 12.5 षटकांत 2 बाद 125 (तनया नाईक नाबाद 57, मेताली गवंडर 33, ऊर्वशी गोवेकर 20, पूजा यादव 1-34, श्रुती दोडामणी 1-14).

वैयक्तिक बक्षिसे

अंतिम सामन्याची मानकरी: ऊर्वशी गोवेकर (ज्ञानप्रसारक), उत्कृष्ट बॅटर: हर्षदा कदम (एमईएस), उत्कृष्ट बॉलर: मेताली गवंडर (ज्ञानप्रसारक), स्पर्धेची मानकरी: तनया नाईक (ज्ञानप्रसारक).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Blue Origin Flight: ऐतिहासिक! राकेश शर्मानंतर गोपीचंद थोटाकुरा ठरले अंतराळात जाणारे दुसरे भारतीय

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

SCROLL FOR NEXT