Eleshion Goa.jpg
Eleshion Goa.jpg 
गोवा

Goa Election : गोव्यात पुढीलवर्षी फेब्रुवारीत निवडणुकीचे बिगुल वाजणार

दैनिक गोमंतक

पणजी : गोव्यातील  विधानसभा निवडणुका (Goa Election) पुढील वर्षी फेब्रुवारी २०२२ मध्ये घेण्यात येतील. अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. (Goa will go to the polls in February next year)

भाजपचे (BJP) राष्ट्रीय सरचीटणीस बी.एल.संतोष यांनी दोन दिवसांपूर्वी गोव्यात भेट देत, राज्यमंत्री, पदाधिकारी, भाजपाचे आमदार आणि भाजपच्या कोअर कमिटीच्या सदस्यांसोबत बैठका घेतल्या. त्यानंतर दोन दिवसांतच गोव्याचे मुख्यमंत्र्यांनी निवडणुकांबाबत सांगितले आहे.

संतोष आणि सी.टी.टी रवी यांच्याशी झालेल्या भेटीबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, या भेटीत गोव्याच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली. निवडणुकीस आता फक्त ६ महिने बाकी आहेत. आम्ही निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. आमचा पक्ष एक संघटना म्हणून काम करीत आहे.

दरम्यान, काँग्रेसचे (Congress) गोव्याचे प्रभारी दिनेश गुंडू राव हे १ जून पासून गोव्याच्या ४ दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. यात ते, पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेतील. तसेच विविध पक्षीय गटांशी देखील चर्चा करतील. अशी माहिती गोवा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले.  

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Goa Today's Live News Update: मतदान आणि मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात मद्यविक्रीस बंदी

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

Mapusa Urban Bank: ''म्‍हापसा अर्बनच्‍या दयनीय स्‍थितीला पर्रीकरचं जबाबदार'', रमाकांत खलप यांचा सनसनाटी आरोप

SCROLL FOR NEXT