Goa News : All Goan people warn to BJP
Goa News : All Goan people warn to BJP  Daink Gomantak
गोवा

तमाम गोमंतकियांचा भाजपला 'इशारा'..

दैनिक गोमन्तक

पणजी (Goa News): जुने गोवे (Old Goa) येथील चर्चच्या पुरातन वारसा क्षेत्रात सुरू असलेले अनधिकृत बांधकाम (Unauthorized construction) निवडणुकीपूर्वी (Election) ते पाडण्यात न आल्यास तमाम गोमंतकियांनी भाजपला कोणीही मतदान न करण्यचा निर्णय जुने गोवे येथे झालेल्या महामोर्चाच्या सभेत घेण्यात आला. जोपर्यंत हे बांधकाम पाडले जात नाही, तोपर्यंत जुने गोवे पुरातन वारसा बचाव चळवळ ही सुरूच राहणार असून सर्वांनी एकजुटीने याविरुद्ध उभे राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

गेल्या काही महिन्यांपासून जुने गोवे पुरातन वारसा बचाव चळवळ स्थानिक लोकांनी सुरू केली आहे. आंदोलने तसेच धरणे धरूनही सरकार या अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे जुने गोवे चर्चचे पावित्र्य अबाधित राखून ठेवण्यासाठी राज्यातील विविध भागातील लोक मोठ्या संख्येने जुने गोवे येथे आयोजित महामोर्चाला उपस्थित राहिले होते. हे क्षेत्र पुरातन वारसा विभाग अखत्यारीत येत असल्याने केंद्र सरकारने त्या अनधिकृत बांधकामाला परवानगी दिली आहे. हे बांधकाम अनधिकृत असल्याचे विभागाच्या अधिकाऱ्याने अहवालात उघड केल्याने त्याचीच बदली करण्यात आली आहे. केंद्र व राज्य सरकारचा या बांधकामाला छुपा पाठिंबा आहे. हे बांधकाम भाजपच्याच एका वजनदार व्यक्तीचे असल्याने कोणीही त्याविरुद्ध कारवाई करण्यास पुढे येत नाही व सरकार या बांधकामाविरुद्ध उत्तर देत नाही अशी टीका उपस्थित नेत्यांनी यावेळी केली.

या चर्चच्या क्षेत्रात बांधकामाला परवानगी देऊन सरकार गोमंतकियांच्या भावना दुखावत असेल तर भाजपला मतदान का करावे असा प्रश्‍न करण्यात आला. जुने गोवे चर्चसभोवतालचे पावित्र्य राखण्यासाठी तसेच गोवा वाचविण्यासाठी सर्वांनी एकजूट होऊन सरकारला योग्य धडा शिकवण्याचे आवाहन सभेत करण्यात आले. यावेळी वास्तू रचनाकार डीन डिक्रुझ, इतिहास तज्ज्ञ प्रा. प्रजल साखदांडे, ॲड. राधाराव ग्रासिएश, ॲड. अँड्रिया मास्कारेन्हास तसेच अरुण वाघ या वक्त्यांनी लोकांना मार्गदर्शन केले. या महासभेला मोठ्या संख्येने लोक राज्यभरातून आले होते. यामध्ये ‘रिव्ह्युलेशनरी गोअन्स’चे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. जुने गोवे चर्च आवारातील एक किलोमीटर बफर झोनमध्ये कोणत्याही प्रकारच्या नव्या बांधकामांना परवानगी नाही. जे बांधकाम सुरू आहे हे चर्चच्या आवारातील क्षेत्रात आहे.

लोकांसोबत काँग्रेस राहणार

गोव्याच्या लोकांनी नेहमीच गोव्याच्या परंपरा, संस्कृती आणि वारशाचा आदर आणि जतन केला आहे. गोवावासियांच्या भावना आणि भावनांचा नेहमीच आदर केला आहे. आम्ही जुने गोव्यातील सर्व बेकायदेशीर कृत्ये थांबवण्यासाठी वचनबद्ध आहोत आणि पवित्र प्रदेशाचे रक्षण करण्यासाठी आम्ही नेहमीच लोकांसोबत राहू, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी ट्विट केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Blue Origin Flight: ऐतिहासिक! राकेश शर्मानंतर गोपीचंद थोटाकुरा ठरले अंतराळात जाणारे दुसरे भारतीय

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

SCROLL FOR NEXT