सणासुदीच्या दिवसांत साखरेचा (Sugar) दर तीन रुपयांनी वाढला आहे. शिवाय कांंदा (Onion)आणि टोमॅटोचे भाव वाढले
सणासुदीच्या दिवसांत साखरेचा (Sugar) दर तीन रुपयांनी वाढला आहे. शिवाय कांंदा (Onion)आणि टोमॅटोचे भाव वाढले  Dainik Gomantak
गोवा

इंधनदर गगनला भिडल्याने, महागाईने मोडले कंबरडे कांद्याने रडविले, साखर झाली कडू

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात गेल्या आठ दिवसांत महागाईचा भडका उडाला आहे. इंधनाचे दर (Fuel rate)आधीच भडकले आहेत. त्यातच भाजीपाल्यासह किराणा मालाचे दर गगनाला भिडले आहेत. ऐन सणासुदीच्या दिवसांत साखरेचा (Sugar) दर तीन रुपयांनी वाढला आहे. शिवाय कांंदा (Onion)आणि टोमॅटोचे भाव वाढले असल्याने राज्यातील सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. केरळ (Kerala), कर्नाटकातील (Karnataka) बेळगाव आणि कलबुर्गी तसेच कोकणात (Konkan) झालेल्या अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याचा पुरवठा मंदावला असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

राज्यात गेल्या आठ दिवसांत भाज्या, फळे आणि किराणा मालाच्या दरासह इंधनाचे दर आभाळाला भिडले आहेत. त्यामुळे ऐन सणासुदीत लोक त्रस्त झाल्याचे चित्र राज्‍यात दिसून येत आहे. मागील आठवड्यात कांदा 30 ते 35 रुपये किलो होता. आता तो 40 ते 60 रुपयांवर पोचल्याची माहिती पणजी मार्केटमधील विक्रेते आजम खान यांनी दिली. टोमॅटोच्‍या दरात तब्बल 30 रुपयांची वाढ झाल्याने गृहिणींचे घरखर्चाचे नियोजनच कोलमडले आहे. कर्नाटकातून येणाऱ्या भाजीपाल्याचे भाव वाढले आहेत. त्यामुळे आम्ही तरी काय करणार? असा प्रश्‍न अली अहमद या व्‍यापाऱ्याने उपस्थित केला.

फुलांचा व्यापार मंदावला

पणजीत २६ फुलांच्या हाराची किमत तब्बल 40 ते 70 रुपयांपर्यंत गेली आहे. त्यामुळे कोणीही ग्राहक दुकानाकडे फिरकत नाही. कर्नाटक आणि महाराष्ट्रातून ही फुले येतात.

इंधन दरवाढीचा फटका बहुतेक सगळ्याच क्षेत्रांना बसला आहे. इंधन दरवाढ पुढील काळातही होतच राहील. कारण, पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाचा गॅस जीएसटीमधून वगळण्यात आला आहे. राज्यांना व्हॅट लावण्याची मुभा असल्याने महसूल मिळविण्यासाठी दरवाढ क्रमप्राप्त ठरते. त्याचा परिणाम वाहतूक आणि दैनंदिन जीवनमानावर होणे स्वाभाविक आहे.

- परेश जोशी, अध्यक्ष, पेट्रोलपंप मालक संघटना

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

Goa Crime News: भागीदारीसाठी गुंतवलेल्या पैशांमध्ये केली अफरातफर; कळंगुट पोलिसांनी सहाजणांविरुद्ध नोंदवला गुन्हा

SCROLL FOR NEXT