Yogesh Kadyan Interpol Red Corner Notice
Yogesh Kadyan Interpol Red Corner Notice Dainik Gomantak
ग्लोबल

Yogesh Kadyan: निरागस चेहऱ्याच्या गॅंगस्टर योगेश कादियान विरोधात रेड कॉर्नर

Rajat Sawant

Yogesh Kadyan Interpol Red Corner Notice: राष्ट्रीय तपास संस्थने (NIA) 19 वर्षीय हरियाणातील गँगस्टर योगेश कडयानच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. योगेश हरियाणातील रहिवासी असून त्याच्यावर अनेक कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. योगेश बनावट पासपोर्टच्या आधारे भारतातून फरार झाला.

दरम्यान, दहशतवादी गुंडगीरीला मोडून काढण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेने पावले उचलली आहेत. एनआयए गुंडांवर तसेच दहशतवादी मॉड्यूलवर कारवाई करण्यासाठी सातत्याने कारवाई करत आहे. योगेश यांच्यासारखे अनेक गुंड बनावट पासपोर्टवर भारतातून पळून गेले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, इंटरपोलने हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील बेरी गावचा रहिवासी योगेश कादियान याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. इंटरपोलच्या वेबसाईटवर त्याची माहिती शेअर करण्यात आली आहे.

योगेशचे वय केवळ 19 वर्षे असून त्याच्या डाव्या हातावर तीळ आहे. त्याचे वय अवघे 19 वर्षे आहे, कमी वयातच तो धोकादायक गुन्ह्यांमध्ये गुंतला होता. त्यामुळेच आज भारतासह अनेक देशांचे पोलीस त्याच्या शोध घेत आहेत.

योगेश कादियान हा बेकायदा पासपोर्ट घेऊन भारतातून पळून गेला असून त्याने अमेरिकेत आश्रय घेतला आहे. गँगस्टर योगेश लहान वयातच शार्प शूटर बनला आहे. त्याचा पंजाबच्या कुख्यात बंबीहा टोळीशीही संबंधित आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Blue Origin Flight: ऐतिहासिक! राकेश शर्मानंतर गोपीचंद थोटाकुरा ठरले अंतराळात जाणारे दुसरे भारतीय

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

SCROLL FOR NEXT