Rana wants top medal from Pakistan
Rana wants top medal from Pakistan 
ग्लोबल

राणाला हवे पाककडून सर्व्वोच्च पदक

दैनिक गोमन्तक

वॉशिंग्टन: मुंबईवरील हल्ल्यात बजावलेल्या ‘कामगिरी’बद्दल मला पाकिस्तान सरकारने सर्वोच्च पदक द्यावे, अशी मागणी दहशतवादी तहव्वूर राणा याने केली होती, असे अमेरिका सरकारने आज येथील न्यायालयात सांगितले. केवळ आपल्यालाच नाही तर, २६/११ चा हल्ला करणाऱ्या लष्करे तैयबाच्या नऊ दहशतवाद्यांनाही पाकिस्तानचा सर्वोच्च लष्करी सन्मान दिला जावा, अशी मागणी राणाने केली होती. 


तहव्वूर राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा नागरिक आहे. मुंबई हल्ल्याचा कट रचणाऱ्यांपैकी एक असलेल्या डेव्हीड कोलमन हेडलीचा तो बालमित्र आहे. भारताने त्याच्या हस्तांतरणाची मागणी केल्यानंतर जूनमध्ये राणाला अमेरिकी पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे. आपल्याला मुक्त करावे, अशी मागणी राणाने केली आहे. त्यावर आज सुनावणी झाली. 


अमेरिकेतील वकील निकोला टी. हॅना यांनी दहशतवाद्यांच्या कटाची माहिती दिली. ‘मुंबई हल्ल्यानंतर हेडली आणि राणा यांच्यात हल्ल्याबाबत चर्चा झाली. या हल्ल्याचा कट रचणाऱ्या पाकिस्तानमधील सूत्रधारांकडून आपण काय शिकलो, याची माहिती हेडलीने राणाला दिली. मुंबई हल्ल्यात मारल्या गेलेल्या नऊ दहशतवाद्यांना पाकिस्तानचा सर्वोच्च लष्करी पुरस्कार मिळायला हवा, असे राणाने हेडलीला म्हटले होते. आपल्यालाही एखादे सर्वोच्च पदक मिळावे, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली होती. हेडलीने गुन्हे कबूल केले आहेत. 

राणाला सोडण्यास विरोध
तहव्वूर राणा याला मुक्त करण्यास अमेरिका सरकारने न्यायालयात विरोध दर्शविला आहे. तो पळून जाण्याचा धोका असल्याचे सरकारने म्हटले आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Blue Origin Flight: ऐतिहासिक! राकेश शर्मानंतर गोपीचंद थोटाकुरा ठरले अंतराळात जाणारे दुसरे भारतीय

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

SCROLL FOR NEXT