5g tibet, china.jpg
5g tibet, china.jpg 
ग्लोबल

तिबेट सीमेजवळ चीनने उभरला जगातील सर्वोच्च 5 जी सिग्नल बेस

दैनिक गोमंतक

नवी दिल्ली : चीनने तिबेट सीमेजवळ जगातील सर्वात उंच ठिकाणावरील रडार साइटवर 5 जी सिग्नल बेस उघडल्याची माहिती मिळाली समोर आली आहे. चिनी सैन्याच्या अधिकृत वेबसाइटने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.  चीनने गुनबाला रडार स्टेशनवर इंटरनेट सेवा सुरू केली आहे. गुनबाला रडार स्टेशन भारत आणि भूतानच्या सीमेला लागून असल्यामुळे ही बातमी भारतासाठी महत्त्वपूर्ण आहे. या टॉवरची उंची समुद्रसपाटीपासून 5,374 मीटर उंच आहे. हे जगातील सर्वात उंचीवर चालणारे रडार स्टेशन असल्याचे चीनी सैन्याचे म्हणणे आहे. तसेच, चीनने आपल्या सैनिकांना 5 जी सेवा देण्यासाठी मागील वर्षी गुनबाला येथील खासगी क्षेत्राच्या सहकार्याने या स्थानकाचे काम सुरू केले होते.  (China emerges as world's top 5G signal base near Tibet border)

चीनच्या सैन्याच्या अधिकृत वेबसाइटनुसार, या 5 जी सेवेमुळे डोंगरावर कंटाळवाणे आयुष्य व्यतीत न करता ते आपल्या कुटुंबीयांशी संपर्कात राहू शकणार आहे. इतकेच नव्हे तर सीमाभागात तैनात केलेल्या सैनिकांच्या चांगल्या प्रशिक्षणासाठी चीनने ही सेवा सुरू केल्याचे म्हटले आहे.  5 जी सिग्नल रडार ऑपरेटर लिन लिंगुई यांनी याबाबत माहिती दिली आहे. तिबेटच्या डोंगराळ भागात सेवेत असलेले सैनिक पुरेशी नेटवर्कअभावी अनेक महीने आणि मित्र परिवरपासून दूर असतात. या 5 जी रडार बेस स्टेशन मुळे त्यांच्यातील हे अंतर कमी होणार आहे. आता या भागात  तैनात असलेले चीनचे सैन्य केव्हाही आपल्या कुटुंबासमवेत मुक्तपणे व्हिडिओ चॅट करू शकतील. 

तथापि, तिबेटच्या पर्वतांवर  17,000 फूटांपेक्षा जास्त उंचीवर 5 जी सिग्नल लाँच करणे, हे चीनच्या पीएलए सैन्यासाठीच्या मोक्याच्या क्षेत्रात राहणीमान व पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग असल्याचेही म्हटले जात आहे.  दरम्यान, चीनने गेल्या वर्षीही जगातील सर्वात उंच असलेल्या तिबेटमधील हिमालयाच्या दुर्गम भांगातही बेस स्टेशन सुरू केले आहे. हे बेस स्टेशन 6,500 मीटर उंचीवर बांधले गेले.  ही सुविधा पर्वतारोहण, वैज्ञानिक संशोधन, पर्यावरण देखरेख आणि उच्च परिभाषा प्रवाहात मदत करेल, असेही चीनने म्हटले आहे. 
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

Goa Today's Live News: चारशे नव्हे दोनशे पार देखील भाजपला जड जाणार - शशी थरुर

United Nations मध्ये भारताचा अमेरिका आणि इस्रायलला दणका; स्वतंत्र पॅलेस्टाईनच्या मागणीला दिला पाठिंबा

SCROLL FOR NEXT