PM Modi
PM Modi Twitter/ @ani_digital
देश

PM मोदी आज राज्यांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या राष्ट्रीय परिषदेला करणार संबोधित, 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमधील एकता नगर येथे आयोजित विविध राज्यांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करणाल आहेत. पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, नरेंद्र मोदी (PM Modi) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या विशेष कार्यक्रमामध्ये उपस्थितांना संबोधित करणार आहेत.

* 6 सेशनमध्ये होणार आहे कार्यक्रम

पीएमओने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, या परिषदेत वनक्षेत्र वाढविण्यावर विशेष भर देण्यात येणार असून, निकृष्ट जमीन पुनर्संचयित करणे आणि वन्यजीव संरक्षणावर विशेष भर देण्यात येणार आहे. 23 आणि 24 सप्टेंबर रोजी होणाऱ्या या दोन दिवसीय परिषदेत 6 विषयगत सत्रे होणार आहेत.

यामध्ये जीवन, हवामान बदलाची आव्हाने, पर्यावरणीय प्रकल्पांसाठी सिंगल विंडो इव्हॅक्युएशन सुविधेसाठी पर्यावरण नियोजन, वन व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण आणि प्रतिबंध, वन्यजीव व्यवस्थापन आणि प्लास्टिक (Plastic) आणि कचरा व्यवस्थापन या विषयांचा समावेश आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सकाळी 10.30 वाजता होणार आहे.

हवामान बदलामुळे (Weather) होणारे नुकसान पाहता सर्वांचे लक्ष पर्यावरणावर आहे. भारत (India) सरकारनेही काही काळापासून यावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. पर्यावरण संवर्धनासाठी सरकार सातत्याने पावले उचलत आहे. त्याच वर्षी केंद्र सरकारने 1 जुलैपासून संपूर्ण देशात एकेरी वापराच्या प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी घातली होती. तेव्हापासून देशात एकेरी वापराच्या प्लास्टिकच्या विक्री आणि खरेदीवर बंदी आहे. आता सरकारने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

Goa Today's Live News Update: कोण होणार ताळगावचे सरपंच-उपसरपंच?

Mapusa Urban Bank: ''म्‍हापसा अर्बनच्‍या दयनीय स्‍थितीला पर्रीकरचं जबाबदार'', रमाकांत खलप यांचा सनसनाटी आरोप

Goa Drug Case: पिशवीत सापडला दोन लाखांचा गांजा; तिस्क उसगाव येथे तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT