एकाच दिवशी दोन महिला क्रिकेट अंपायरने रचला इतिहास

Pranali Kodre

महिला पंचांनी रचला इतिहास

क्रिकेटमध्ये 14 डिसेंबर 2023 रोजी दोन महिला क्रिकेट पंचांनी इतिहास रचला आहे.

Jacqueline Williams | X/windiescricket

वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड

14 डिसेंबर रोजी वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात दुसरा टी20 सामना ग्रेनेडाला पार पडला. या सामन्यात वेस्ट इंडिजने 10 धावांनी विजय मिळवला.

Jacqueline Williams | X/windiescricket

पंच

या सामन्यात वेस्ट इंडिजच्या 47 वर्षीय जॅकलिन विल्यम्स यांनी पंच म्हणून जबाबदारी पार पाडली.

Jacqueline Williams | X/windiescricket

जॅकलिन विल्यम्स

त्यामुळे जॅकलिन या आयसीसीचे पूर्ण सदस्यत्व असलेल्या दोन संघात झालेल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात पंच म्हणून काम करणाऱ्या वेस्ट इंडिजच्या पहिल्या महिला ठरल्या.

Jacqueline Williams | X/ windiescricket

भारतीय महिला विरुद्ध इंग्लंड महिला

त्याचबरोबर भारतीय महिला क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड महिला क्रिकेट संघ यांच्यात नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर कसोटी सामना 14 डिसेंबरपासून सुरु झाला.

Jemimah Rodrigues - Shubha Satheesh | X/BCCIWomen

पंच

या कसोटी सामन्यात वृंदा राठी यांनी पंच म्हणून काम पाहिले.

Vrinda Rathi | X

भारतीय पंच

त्यामुळे वृंदा राठी या कसोटी सामन्यात पंच म्हणून काम पाहाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला पंच ठरल्या.

Vrinda Rathi | X

2018 साली परिक्षा पास

वृंदा राठी यांनी 2018 साली बीसीसीआयची पंचांसाठी असलेली परिक्षा पास केली होती.

Vrinda Rathi | X

भारतात Google वर 2023 वर्षात ट्रेंड झालेल्या टॉप 5 व्यक्तींमध्ये 'हे' तीन क्रिकेटर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill