Sameer Panditrao
भारत हा सूर्यप्रकाशाने नटलेला देश असूनही, सत्तर-नव्वद टक्के लोकांमध्ये व्हिटॅमिन Dची कमतरता आढळते.
शहरी जीवनात बहुतेक वेळ आपण घरात, ऑफिसमध्ये किंवा वाहनात घालवतो. काचेमागून मिळणारा प्रकाश त्वचेत व्हिटॅमिन D तयार करत नाही.
सन्स्क्रीन UVB किरणं अडवतो, आणि तेच किरण व्हिटॅमिन D तयार करतात. त्यात भर म्हणजे सूर्यप्रकाश टाळण्यासाठी लांब कपडे, हातमोजे आणि स्कार्फ वापरणं.
शहरांमधील धूर आणि धुकं UVB किरणांना पृथ्वीवर पोहोचू देत नाही.
गडद त्वचेत मेलेनिन जास्त असतं, जे नैसर्गिकरीत्या UVB किरणं अडवतं. त्यामुळे गडद त्वचेला जास्त वेळ सूर्यप्रकाशात राहावं लागतं.
शाकाहारी अन्नात नैसर्गिक व्हिटॅमिन D जवळजवळ नसतं. ते प्रामुख्याने अंडं, मासे, यकृत तेल (cod-liver oil) आणि फोर्टिफाइड दुधात असतं.
व्हिटॅमिन D चरबीमध्ये साठत असल्याने जाड लोकांमध्ये त्याची रक्तातील पातळी कमी दिसते. याशिवाय लिव्हर, किडनी किंवा आतड्यांचे आजार त्याचं शोषण कमी करतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.