Akshata Chhatre
दिवाळीचे नाव ऐकताच फटाक्यांचा आवाज आणि गोड मिठाईचा विचार मनात येतो.
पण मधुमेहाचे रुग्ण अनेकदा सणासुदीच्या पदार्थांपासून दूर राहण्याची चिंता करतात.
आता या दिवाळीत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही! तुम्ही या प्रभावी टिप्स वापरून कोणत्याही भीतीशिवाय आनंद साजरा करू शकता.
बाजारातील मिठाईऐवजी खजूर, अंजीर किंवा नाचणीची बर्फी असे आरोग्यदायी पर्याय निवडा आणि गोडव्यासाठी स्टेव्हिया किंवा गुळाचा वापर करा.
गोड पदार्थांना पूर्णपणे टाळण्याऐवजी, पोर्शन कंट्रोलवर लक्ष केंद्रित करा आणि मोठ्या मिठाईऐवजी छोटा तुकडा खा.
फराळ करण्यापूर्वी सॅलड किंवा भाजलेले चणे यांसारखे फायबरयुक्त स्नॅक्स घ्या, ज्यामुळे शुगरची पातळी अचानक वाढत नाही.
त्याचबरोबर, १०-१५ मिनिटांचा वॉक किंवा डान्स यांसारखे शारीरिक उपक्रमविसरू नका. थोडासा समजूतदारपणा आणि योग्य नियोजनाने तुमची दिवाळी 'हॅपी' सोबतच 'हेल्दी' देखील बनेल!