Manish Jadhav
अवघ्या 16व्या वर्षी शिवरायांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचा श्रीगणेशा केला. या किल्ल्यावर विजय मिळवून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली, म्हणून याला 'तोरणा' हे नाव अत्यंत सार्थ ठरले.
तोरणा हा पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच आणि विस्तीर्ण किल्ला आहे. गडाचा प्रचंड विस्तार आणि अजस्त्र तटबंदी पाहून महाराजांनी त्याचे नामकरण 'प्रचंडगड' असे केले. हा किल्ला सह्याद्रीचा गरुड मानला जातो.
तोरणा किल्ला त्यावेळी विजापूरच्या आदिलशाहीच्या ताब्यात होता. मात्र, तिथला किल्लेदार बेसावध असल्याचे ओळखून महाराजांनी आपल्या सवंगड्यांसह गडावर स्वारी केली आणि विनापरवाना किल्ला ताब्यात घेऊन स्वराज्यात सामील केला.
गडाची डागडुजी करत असताना महाराजांना मोहरांनी भरलेल्या चार हंडे सापडले. हा 'आई भवानीचा आशीर्वाद' मानून महाराजांनी त्या धनाचा वापर स्वराज्याच्या विस्तारासाठी आणि शस्त्रास्त्रे खरेदीसाठी केला.
तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या गुप्त खजिन्यातूनच महाराजांनी समोरच्या 'मुरुंबदेवाचा डोंगर' वसवण्याचे ठरवले. याच धनातून पुढे स्वराज्याची पहिली राजधानी 'किल्ले राजगड' उभी राहिली.
तोरणा किल्ल्यावर 'झुंजार माची' ही सर्वात अभेद्य मानली जाते. गडाच्या संरक्षणासाठी ही माची एखाद्या चिलखताप्रमाणे काम करायची. इथली तटबंदी पाहून आजही इंजिनिअर्स थक्क होतात.
गडावर एका बाजूला 'बुधला माची' आहे. याचा आकार उपड्या ठेवलेल्या बुधल्यासारखा (तेलाचे पात्र) दिसतो. हा भाग गडाचा सर्वात दुर्गम आणि शत्रूसाठी कठीण असा भाग होता.
तोरणा किल्ला जिंकल्याची बातमी जेव्हा विजापूर आणि दिल्लीपर्यंत पोहोचली, तेव्हा मोगल आणि आदिलशाही सत्ता हादरल्या. एका लहानशा मावळ्याने डोंगरदऱ्यात आपले स्वराज्य उभे करायला सुरुवात केली, याची पहिली चाहूल याच किल्ल्याने दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.