Manish Jadhav
1683 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी गोव्यातील पोर्तुगीजांविरुद्ध मोठी मोहीम उघडली. पोर्तुगीजांच्या अन्यायकारक धोरणांना उत्तर देण्यासाठी मराठा सैन्य गोव्यात शिरले.
बार्देश तालुक्यातील शापोरा नदीच्या मुखावर हा किल्ला स्थित आहे. समुद्रावर आणि आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी शापोरा किल्ला पोर्तुगीजांसाठी अत्यंत महत्त्वाचा होता.
संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने 1684 मध्ये या किल्ल्यावर हल्ला चढवला. मराठ्यांच्या गनिमी काव्यासमोर आणि आक्रमकतेसमोर पोर्तुगीज हतबल झाले.
मराठ्यांचा पराक्रम पाहून शापोरा किल्ल्याचा पोर्तुगीज किल्लेदार प्रचंड घाबरला. मोठी हानी टाळण्यासाठी त्याने युद्ध न करताच संभाजी महाराजांसमोर शरणागती पत्करली.
शापोरा किल्ला जिंकणे हा पोर्तुगीजांसाठी मोठा धक्का होता. संभाजी महाराजांनी केवळ हा किल्लाच नाही, तर बार्देश आणि साष्टीमधील अनेक भाग काही दिवसांतच आपल्या ताब्यात घेतले.
आदिलशाही काळात बांधलेला हा किल्ला पोर्तुगीजांनी जिंकला होता. मात्र, संभाजी महाराजांनी आपल्या शौर्याने त्यावर मराठ्यांचा भगवा ध्वज फडकवला.
शापोरा किल्ल्याच्या तटबंदीवरुन अरबी समुद्राचे विहंगम दृश्य दिसते. मराठ्यांनी या किल्ल्याचा वापर करुन पोर्तुगीजांच्या सागरी हालचालींवर नियंत्रण मिळवले होते.
आज जरी हा किल्ला पर्यटनासाठी (आणि 'दिल चाहता है' चित्रपटामुळे) प्रसिद्ध असला, तरी इथला प्रत्येक दगड संभाजी महाराजांच्या गोव्यातील देदीप्यमान विजयाची साक्ष देतो.