Tikona Fort: मराठ्यांनी परत मिळवलेला किल्ला, तहातील तोफगोळ्यांनी झालेली 'तिकोना'ची वाताहत

Sameer Amunekar

तिकोना किल्ला

मुंबई-पुणे हमरस्त्यावरुन दिसणारे लोहगड आणि विसापूर किल्ले आपल्याला सर्वांना माहीत आहेत. याच किल्ल्यांच्या मागील बाजूस पवनमाळ प्रांतात तिकोना किल्ला आहे.

Tikona Fort | Dainik Gomantak

निजामशाहीत समावेश

इ.स. १५८५ च्या सुमारास निजामशाहीचा सरदार मलिक अहमद यांनी हा किल्ला जिंकला आणि तो निजामशाहीच्या ताब्यात आला.

Tikona Fort | Dainik Gomantak

स्वराज्यात सामील

१६५७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणातील माहुली, लोहगड, विसापूर, सोनगड, तळा, कर्नाळा तसेच हा किल्ला आपल्या स्वराज्यात सामील केला.

Tikona Fort | Dainik Gomantak

पवन मावळावर देखरेख

किल्ल्याचा उपयोग संपूर्ण पवन मावळावर देखरेख ठेवण्यासाठी केला जात असे.

Tikona Fort | Dainik Gomantak

नेताजी पालकरांची नियुक्ती

सन १६६० मध्ये या भागाच्या सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती करण्यात आली.

Tikona Fort | Dainik Gomantak

पुरंदर तहानुसार ताबा बदल

१२ जून १६६५ रोजी पुरंदर तहानुसार, १८ जूनला कुबादखानाने हलालखान व इतर सरदारांसह या परिसराचा ताबा घेतला.

Tikona Fort | Dainik Gomantak

अकबर भेट

अकबर तिकोना किल्ल्यावर राहिला होता, परंतु नंतर जैतापूर येथे त्याला धाडण्यात आलं.

Tikona Fort | Dainik Gomantak

इंग्रज-मराठा लढाई

इ.स. १८१८ मध्ये इंग्रज आणि मराठ्यांमध्ये या किल्ल्यावर लढाई झाली, ज्यामुळे किल्ल्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आज किल्ला मोठ्या प्रमाणावर जीर्णावस्थेत आहे.

Tikona Fort | Dainik Gomantak

ग्लास स्किनचं रहस्य! फक्त 7 दिवसांत 'ही' होममेड नाईट क्रीम देईल 'कोरियन ग्लो'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Skin Care Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा