Ashutosh Masgaunde
भारतीय संघाच्या पुढील मुख्य निवडकर्त्याचा शोध अखेरीस 4 जुलै रोजी संपुष्टात आला. माजी खेळाडू अजित आगरकरची या पदावर नियुक्ती करण्यात आली.
टीम इंडियाचे नवे मुख्य निवडकर्ता अजित आगरकरने आपल्या कारकिर्दीत भारतीय संघासाठी 191 एकदिवसीय सामन्यांमध्ये 27.85 च्या सरासरीने 288 बळी घेतले आहेत.
अजित आगरकरने कसोटी फॉरमॅटमध्ये भारतीय संघासाठी 26 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 58 विकेट्स घेतल्या तर फलंदजीत 571 धावा केल्या आहेत.
आगरकरचे कसोटीत 1 शतकही झळकावले आहे, जे त्याने 2002 मध्ये टीम इंडियाच्या इंग्लड दौऱ्यात लॉर्ड्स मैदानावर केले होते.
वनडे फॉरमॅटमध्ये भारतीय खेळाडू म्हणून सर्वात वेगवान अर्धशतक झळकावण्याचा विक्रम नवीन मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या नावावर आहे.
आगरकरने केवळ 23 सामन्यांमध्ये 50 एकदिवसीय विकेट पूर्ण केल्या. हा विक्रम जवळपास एका दशकानंतर श्रीलंकेचा फिरकीपटू अजंथा मेंडिसने मोडला, ज्याने 19 सामन्यांमध्ये हा पराक्रम केला.
2003 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धची अॅडलेड ओव्हल कसोटी आगरकरने 41 धावांत 6 बळी घेतले आणि भारतीय संघ 20 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात कसोटी जिंकण्यात यशस्वी ठरला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.