Ashutosh Masgaunde
मार्क बाउचरचा जन्म 3 डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतील पूर्व लंडन येथे झाला.
बाउचरने तरुण वयात अनेक खेळ खेळले आहेत. त्याने क्रिकेट, स्क्वॅश, क्रॉस-कंट्री, टेनिस आणि रग्बी संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
मार्क बाउचरने त्याच्या वयाच्या 20 व्या वर्षापर्यंत स्क्वॅश खेळणे सुरू ठेवले. 1995 मध्ये त्याला दक्षिण आफ्रिकेच्या अंडर-19 संघात इंग्लंड दौऱ्यासाठी बोलावण्यात आले तेव्हा त्याने क्रिकेटला खूप गांभीर्याने घेतले.
क्रिकेटमधील निवृत्तीनंतर बाउचरने प्रशिक्षक म्हणून जम बसवला आहे. तो सध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक आहे.
मार्च 2006 मध्ये जोहान्सबर्ग येथे जोहान्सबर्ग येथे झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मध्ये 438 धावांचा पाठलाग करताना अंतिम चेंडूवर विजय मिळवून दिला होता.
9 जुलै 2012 रोजी मार्क बाउचरच्या डाव्या डोळ्याला बेल्स लागल्याने गंभीर दुखापत झाली. या दुखापतीमुळे त्याने 10 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
मार्क बाउचरला गोल्फची आवड आहे आणि तो नियमितपणे खेळतो.