Sameer Amunekar
दररोज शक्यतो एकाच वेळेला झोपण्याची आणि उठण्याची सवय लावा. यामुळे शरीराचं नैसर्गिक झोपेचं चक्र सुधारण्यास मदत होते.
झोपण्याच्या किमान 30-60 मिनिटे आधी मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्हीचा वापर कमी करा. स्क्रीनमुळे झोप येण्यास उशीर होऊ शकतो.
कॅफिनमुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी चहा, कॉफी किंवा एनर्जी ड्रिंक्स टाळण्याचा प्रयत्न करा.
खोलीतील जास्त प्रकाश, आवाज आणि अस्वस्थ तापमान झोपेमध्ये अडथळा आणू शकतात. शांत वातावरण तयार करा.
दिवसभर थोडं चालणं किंवा नियमित व्यायाम केल्याने शरीराला आराम मिळतो आणि रात्री चांगली झोप लागू शकते.
हलके संगीत ऐकणे, पुस्तक वाचणे किंवा काही मिनिटे श्वसनाचे व्यायाम केल्याने तणाव कमी होण्यास मदत होऊ शकते.
झोपण्याआधी जड किंवा अतितिखट जेवण टाळा. हलका आहार आणि योग्य वेळेचं जेवण आरामदायी झोपेसाठी उपयुक्त ठरू शकतं.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.