Monsoon Trekking: धुक्याची गडद चादर अन् सोसाट्याचा वारा, पावसाळी ट्रेकचा बादशहा 'सिंहगड'; तानाजी मालुसरेच्या शौर्याची देतो साक्ष

Manish Jadhav

धुक्याची चादर आणि निसर्गरम्य वातावरण

पावसाळा सुरु झाला की, संपूर्ण सिंहगड किल्ला आणि परिसर हिरवागार होतो. किल्ल्यावर दाट धुके आणि सोसाट्याचा वारा असतो, ज्यामुळे ट्रेकर्संना स्वर्गीय अनुभूती मिळते.

Sinhagad Fort Attraction | Dainik Gomantak

ट्रेकिंगचे दोन मुख्य पर्याय

किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिला म्हणजे पायथ्यापासून (आटकरवाडी) जाणारा ट्रेकिंगचा रस्ता, ज्याने चढायला साधारण 1 ते दीड तास लागतो. दुसरा पर्याय म्हणजे थेट वाहनाने वर जाणे.

Sinhagad Fort | Dainik Gomantak

गरमागरम पिठलं-भाकरी आणि भजी

सिंहगडचा ट्रेक येथील प्रसिद्ध खाद्यपदार्थांशिवाय अपूर्ण आहे. ट्रेक करुन वर पोहोचल्यावर गरमागरम कांदा भजी, चुलीवरचे पिठलं-भाकरी, मडक्यातील दही आणि सोबतीला गरमागरम चहा खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो.

Sinhagad Fort | Dainik Gomantak

पाण्याचे झरे आणि धबधबे

पावसाळ्यात गडाच्या कड्यांवरून वाहणारे पाण्याचे छोटे झरे आणि धबधबे पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरतात. विशेषतः देवटाके येथील गोड आणि थंड पाणी ट्रेकर्सची तृष्णा भागवते.

Sinhagad Fort

ऐतिहासिक वारसा आणि स्मारके

ट्रेकिंगसोबतच तुम्हाला नरवीर तानाजी मालुसरे यांचे स्मारक, अमृतेश्वर मंदिर, देवटाके आणि कल्याण दरवाजा या ऐतिहासिक वास्तू पाहता येतात, ज्यामुळे या ट्रेकला ऐतिहासिक महत्त्वही प्राप्त होते.

Sinhagad Fort Attraction | Dainik Gomantak

वाहतूक कोंडी आणि पार्किंगचे नियोजन

पावसाळ्यात विकेंडला (शनिवार-रविवार) येथे प्रचंड गर्दी होते. त्यामुळे घाटात मोठी वाहतूक कोंडी होऊ शकते. ही कोंडी टाळण्यासाठी शक्यतो सकाळी लवकर निघणे किंवा सार्वजनिक पीएमपीएमएल (PMPML) बसचा वापर करणे सोयीचे ठरते.

Sinhagad Fort | Dainik Gomantak

सुरक्षेची काळजी आणि योग्य पूर्वतयारी

पावसाळ्यात गडावरील दगड आणि पायवाटा निसरड्या होतात. त्यामुळे ट्रेकिंगसाठी उत्तम ग्रीप असलेले शूज वापरावेत. तसेच कड्यांच्या कडेला जाऊन सेल्फी काढणे टाळावे आणि सोबत रेनकोट किंवा छत्री आवर्जून ठेवावी.

Sinhagad Fort | Dainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nanemachi Waterfall | Dainik Gomantak
आणखी बघा