Akshata Chhatre
अनेकांना टॅटू बनवण्याची आवड असते, पण यांमध्ये काही असेही असतात ज्यांना देवांचे टॅटू काढायला आवडतात.
प्रेमानंद महाराजांनी तरुणांना देवांच्या टॅटूबद्दल माहिती दिली आहे. क्रिकेटपटू विराट कोहलीसह अनेकजणं महाराजांकडे वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तर शोधत येतात.
प्रेमानंद महाराजांकडे असाच एक माणूस टॅटूबद्दल प्रश्न घेऊन आला होता की, देवांचे टॅटू काढावेत का नाही? त्या माणसाने डाव्या हातावर टॅटू काढला होता. हे बघून महाराज म्हणाले की आपण डाव्या हाताचा वापर शौचालयात करतो.
शिवाय हातावरून हे पाणी अंघोळीच्यावेळी पायांपर्यंत जातं आणि यामुळे देवाचा अपमान होतो. प्रेमानंद महाराजांनी म्हटलं की अशाप्रकारे देवांचे टॅटू किंवा नावं लिहू नये.
जर का कोणी असा टॅटू केलेला असेल तर तो वेळीच काढावा किंवा त्याजागी वेगळा टॅटू बनवून घ्यावा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.