Bhairavgad Fort: 'भैरवगड' जिथे दरी आणि ताशीव कडे इतिहासाची साक्ष देतात

Sameer Amunekar

भैरवगड

भैरवगड हा किल्ला सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून काहीसा वेगळ्या डोंगरावर बांधला असून, तिन्ही बाजूंनी दरी आणि कडा आहेत. फक्त पूर्वेकडील बाजू मुख्य रांगेशी जोडलेली आहे आणि तेथूनच प्रवेश करता येतो.

Bhairavgad Fort | Dainik Gomantak

रामदास स्वामींशी संबंधित गुहा

पाटण तालुक्यातील कोयनानगर गावाजवळून भैरव मंदिरापर्यंत पोहोचता येते; वाटेत रामघळ नावाची समर्थ रामदास स्वामींशी संबंधित गुहा आहे.

Bhairavgad Fort | Dainik Gomantak

गडाचा पश्चिमेकडील भाग

खिंडीतून पुढे गडाची पश्चिमेकडील बाजू जाताना उजवीकडे किल्ला, डावीकडे दरी दिसते; भग्न दरवाजाचे अवशेष पहायला मिळतात.

Bhairavgad Fort | Dainik Gomantak

तटबंदी

गडाचा पूर्वाभिमुख दरवाजा खांबांच्या अवशेषांवरून ओळखता येतो; दक्षिणेकडील तटबंदी आणि बुरुजाचे भग्न अवशेष सध्या अर्धवर्तुळाकार पायाच्या स्वरूपात दिसतात.

Bhairavgad Fort | Dainik Gomantak

बारमाही पाणी

गडाच्या पश्चिमेकडील कातळात एकमेव पाण्याची टाकी आहे, ज्यात बारमाही पाणी राहते.

Bhairavgad Fort | Dainik Gomantak

सर्वोच्च माथ्यावर जाणारी वाट

गडाच्या सर्वोच्च माथ्यावर जाणारी वाट अत्यंत घसाऱ्याची आणि अवघड आहे, त्यामुळे किल्ला दुर्गमतेसाठी प्रसिद्ध आहे.

Bhairavgad Fort | Dainik Gomantak

ऐतिहासिक महत्त्व

गडाजवळून भैरव, गोवळ, सांबरसरी या तीन घाटमार्ग कोकणात उतरतात; यावर नजर ठेवण्यासाठी किल्ला बांधल्याची शक्यता आहे, पण कधी व कोणी बांधला याची माहिती उपलब्ध नाही.

Bhairavgad Fort | Dainik Gomantak

केस गळतायत? 'हे' उपाय नक्कीच प्रभावी ठरतील

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hair Care Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा