Sameer Amunekar
तांदळाच्या पाण्यात व्हिटॅमिन B, E, अँटिऑक्सिडंट्स आणि अमिनो ॲसिड्स असतात, जे त्वचेला पोषण देण्यास मदत करतात.
चेहरा धुतल्यानंतर तांदळाचं पाणी 5-10 मिनिटं लावून ठेवा. नियमित वापरामुळे त्वचा तजेलदार दिसू शकते.
तांदळाचं पाणी त्वचेचा ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करू शकतं, त्यामुळे त्वचा मऊ आणि फ्रेश वाटते.
अतिरिक्त तेल नियंत्रित करण्यात मदत होऊ शकते, ज्यामुळे चेहरा अधिक स्वच्छ आणि ताजातवाना दिसतो.
काही लोकांच्या अनुभवांनुसार नियमित वापरामुळे त्वचेचा पोत सुधारल्यासारखा वाटू शकतो आणि पोर्स कमी उठून दिसू शकतात.
तांदूळ स्वच्छ धुवून 20-30 मिनिटे पाण्यात भिजवा. ते पाणी गाळून कॉटनच्या मदतीने चेहऱ्यावर लावा.
संवेदनशील त्वचा असल्यास आधी पॅच टेस्ट करा. कोणतीही जळजळ, खाज किंवा त्रास जाणवल्यास वापर थांबवा आणि त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.