Gardening Tips: हिरवीगार झाडं अचानक वाळतायत? पावसाळ्यात खत वापरताना 'या' गोष्टींची विशेष काळजी घ्या

Sameer Amunekar

जास्त पाणीही ठरू शकतं घातक

पावसाळ्यात आधीच माती ओलसर असते. अशावेळी अतिरिक्त पाणी दिल्यास मुळे कुजू लागतात.

Gardening Tips | Dainik Gomantak

ओल्या मातीत खत टाकू नका

सतत भिजलेल्या मातीत खत टाकल्यास पोषकद्रव्ये वाहून जातात आणि झाडांना फायदा होत नाही.

Gardening Tips | Dainik Gomantak

रासायनिक खताचा अतिरेक टाळा

जास्त प्रमाणात रासायनिक खत वापरल्यास मुळे जळू शकतात आणि झाडे वाळू शकतात.

Gardening Tips | Dainik Gomantak

योग्य ड्रेनेज असणे आवश्यक

कुंडी किंवा बागेत पाणी साचल्यास मुळांना ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळे झाडांची वाढ खुंटते.

Gardening Tips | Dainik Gomantak

खत टाकण्याची योग्य वेळ निवडा

मुसळधार पाऊस सुरू असताना खत टाकू नका. पाऊस थांबल्यानंतर किंवा हलक्या ओलाव्यात खत द्या.

Gardening Tips | Dainik Gomantak

सेंद्रिय खताचा वापर करा

कंपोस्ट, शेणखत किंवा वर्मीकंपोस्ट वापरल्यास झाडांना हळूहळू पोषण मिळते आणि मातीही सुपीक राहते.

Gardening Tips | Dainik Gomantak

पिवळी पाने आणि कुजलेली फांदी त्वरित काढा

आजारी किंवा कुजलेले भाग काढून टाकल्यास झाड निरोगी राहते आणि बुरशीचा संसर्ग कमी होतो.

Gardening Tips | Dainik Gomantak

फक्त 'या' 7 सवयी अंगीकारा अन् मिळवा नैसर्गिक चमकदार त्वचा

Habits For Glowing Skin | Dainik Gomantak
येथे क्लिक करा