Raghuram Rajan: ‘’...म्हणून मी राजकारणापासून दूर, राहुल गांधी स्मार्ट’’

Manish Jadhav

देशात लोकसभा निवडणुकीचा माहोल

देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा माहोल आहे. अंतिम टप्प्यातील मतदान येत्या 1 जून रोजी होत आहे. यातच, रघुराम राजन यांच्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे.

Raghuram Rajan | Dainik Gomantak

रघुराम राजन यांच्याबाबत चर्चांना उधान

भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) माजी गव्हर्नर रघुराम राजन लवकरच काँग्रेस पक्षात सामील होणार अशी चर्चा सुरु होती. परंतु आता खुद्द राजन यांनी राजकारणापासून दूर राहण्याचं कारणं सांगितलं.

Raghuram Rajan | Dainik Gomantak

‘कुटुंबामुळे राजकारणापासून दूर’

राजन म्हणाले की, ‘’कुटुंबामुळे राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी राजकारणात जावे अशी त्यांची पत्नी आणि कुटुंबीयांची इच्छा नाही.’’

Raghuram Rajan | Dainik Gomantak

राहु गांधी हुशार व्यक्ती

राहुल गांधी यांचे कौतुक करताना ते म्हणाले की, ‘’ते एक हुशार आणि बुद्धिमान व्यक्ती आहेत. त्यांना अनेकदा विचार करण्याची आणि नेतृत्व करण्याची क्षमता नसलेली व्यक्ती म्हणून हिणवले जाते. परंतु ते पूर्णपणे चुकीचे आहे.’’

Raghuram Rajan | Dainik Gomantak

‘माझे काम राजकारण नाही, मी अर्थतज्ज्ञ आहे’

द प्रिंटला दिलेल्या मुलाखतीदरम्यान राजन म्हणाले की, ‘’माझे काम राजकारण नाही हे मी अनेकदा स्पष्ट केले आहे. मी एक अर्थशास्त्रज्ञ आहे. आर्थिक घडामोडीसंबंधी काम मला खूप चांगले जमते.’’

Raghuram Rajan | Dainik Gomantak

भारत जोडो यात्रेत सहभागी

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत राजन सहभागी झाले होते. यानंतर ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरु झाली होती. यावर रघुराम राजन यांना पुढील मनमोहन सिंग व्हायचे आहे, असे भाजपने म्हटले होते.

Raghuram Rajan | Dainik Gomantak

राजन मोदी सरकारचे टीकाकार मानले जातात

रघुराम राजन यांच्याकडे नरेंद्र मोदी सरकारचे टीकाकार म्हणून पाहिले जाते. त्यांनी सरकारची पीएलए योजना आणि चिप उद्योगातील प्रचंड गुंतवणूक यावरुन अनेकदा मोदी सरकारवर टीका केली.

Raghuram Rajan | Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran President Ebrahim Raisi Death | Dainik Gomantak