Manish Jadhav
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या निधनानंतर इराणसह जगभरातील लोकांनी शोक व्यक्त केला. 30 लाखांहून अधिक लोक त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.
दुसरीरकडे मात्र, काही ठिकाणी रईसी यांच्या मृत्यूवर आनंद साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे, आनंद साजरा करण्यासाठी काही लोकांसह महिलांनी न्यूड फोटोंचा आधार घेतला.
सोशल मीडियावर न्यूड फोटो पोस्ट करण्यात आले. तर अनेकांनी रईसी यांचा नामोउल्लेख 'इराणचा कसाई' असा केला. आता हे लोक त्यांच्या मृत्यूनंतर आपण मुक्त झालो असल्याचा आनंद साजरा करत आहेत.
राजकीय विश्लेषक हनीह झियाई यांनी सांगितले की, रईसी यांच्या मृत्यूवर आनंद व्यक्त करण्यासाठी न्यूड फोटो पोस्ट करणे म्हणजे त्यांना कोणत्यातरी जोखडातून मुक्त झाल्यासारखे वाटते.
इराण इंटरनॅशनलच्या वृत्तानुसार, नग्न होऊन रईसी यांच्या मृत्यूवर आनंद साजरा करण्याची कल्पना X वर एका इन्फ्लुएन्सरने केलेल्या ट्विटवरुन आली.
त्याने रईसी यांच्या बेपत्ता होण्यावर ट्विट करत म्हटले होते की, जर रईसी यांचा मृत्यू झाला तर मी माझा न्यूड फोटो शेअर करेन. त्याने हे विनोद किंवा राजकीय अभिव्यक्ती म्हणून सांगितले हे माहित नाही.
इन्फ्लुएन्सरच्या ट्विटनंतर हजारो इराणी लोक त्याच्या या मोहिमेत सामील झाले आणि त्यांनी न्यूड फोटो सोशल मीडियावर शेअर केले.