R Ashwin 'असा' पराक्रम करणारा पहिलाच आशियाई अष्टपैलू

Pranali Kodre

भारत विरुद्ध इंग्लंड

भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेतील चौथा सामना 23 फेब्रुवारी 2024 पासून रांचींमध्ये सुरू झाला आहे.

Team India | AFP

अश्विनची इंग्लंडविरुद्ध 100 वी विकेट

या सामन्यात अश्विनने 22 व्या षटकात जॉनी बेअरस्टोला 38 धावांवर बाद केले. ही अश्विनची इंग्लंडविरुद्धची कसोटीतील 100 वी विकेट ठरली.

R Ashwin | AFP

पहिला भारतीय गोलंदाज

अश्विन इंग्लंडविरुद्ध कसोटीत 100 विकेट्स घेणारा भारताचा पहिलाच गोलंदाज ठरला आहे.

R Ashwin 500 Wickets | AFP

पहिलाच आशियाई अष्टपैलू

याबरोबरच अश्विनने इंग्लंडविरुद्ध फलंदाजी करताना कसोटीत 1000 पेक्षा अधिक धावाही केलेल्या आहेत. त्यामुळे तो एकाच प्रतिस्पर्धीविरुद्ध कसोटीत 1000 धावा आणि 100 विकेट्स घेणारा पहिलाच आशियाई अष्टपैलू ठरला आहे.

R Ashwin 500 Wickets | AFP

दिग्गज

यापूर्वी असा विक्रम जॉर्ज जिफेन, मॉन्टी नोबल, विलफ्रेड ऱ्होड्स, गॅरी सोबर्स, इयान बॉथम आणि स्टुअर्ट ब्रॉड या आशिया खंडाबाहेरील खेळाडूंनी केला आहे.

George Giffen, Monty Noble, Garry Sobers, Wilfred Rhodes, Ian Botham, Stuart Broad | X/ICC

इंग्लंडविरुद्ध 1000 धावा अन् 100 विकेट्स

जॉर्ज जिफेन, मॉन्टी नोबल आणि गॅरी सोबर्स यांनी इंग्लंडविरुद्ध कसोटीत 1000 पेक्षा अधिक धावा आणि 100 पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.

George Giffen, Monty Noble, Garry Sobers | X/ICC

ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1000 धावा अन् 100 विकेट्स

विलफ्रेड ऱ्होड्स, इयान बॉथम आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत 1000 पेक्षा अधिक धावा आणि 100 पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.

Wilfred Rhodes, Ian Botham, Stuart Broad | X/ICC

टीम इंडियाविरुद्ध कसोटीत सर्वाधिक शतके करणारे पाच फलंदाज

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Joe Root | Most Test Centuries against England | PTI