Pranali Kodre
भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेतील चौथा सामना 23 फेब्रुवारी 2024 पासून रांचीमध्ये खेळवला गेला.
या सामन्यात इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुटने पहिल्याच डावात शतकी खेळी केली. रुटने 219 चेंडूत त्याचे हे शतक पूर्ण केले.
रुटचे हे भारताविरुद्ध कसोटीतील 10 वे शतक ठरले. त्यामुळे तो भारताविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतके करणारा फलंदाज ठरला आहे.
रुटने हा विक्रम करताना ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला मागे टाकले आहे. स्मिथने कसोटीत भारताविरुद्ध 37 डावात 9 शतके केली आहेत.
भारताविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर रिकी पाँटिंग, विव रिचर्ड्स आणि गॅरी सोबर्स संयुक्तरित्या आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगने कसोटीत भारताविरुद्ध 51 डावात 8 शतके केली आहेत.
वेस्ट इंडिजच्या विव रिचर्ड्स यांनीही कसोटीत भारताविरुद्ध 41 डावात 8 शतके केली आहेत.
वेस्ट इंडिजच्याच गॅरी सोबर्स यांनीही कसोटीत भारताविरुद्ध 30 डावात 8 शतके केली आहेत.