मनोज तिवारीचा देशांतर्गत क्रिकेटला बाय-बाय

Ashutosh Masgaunde

विजयी निरोप

क्रिकेटपटू मनोज तिवारीने नुकताच प्रथम श्रेणी क्रिकेटला अलविदा केला. ईडन गार्डन्स स्टेडियमवर रणजी ट्रॉफी सामन्यात बंगालने बिहारवर शानदार विजय मिळवत मनोजच्या 20 वर्षांच्या कारकिर्दीला निरोप दिला.

Manoj tiwary Retires From Domestic Cricket

आंतरराष्ट्रीय निवृत्ती

38 वर्षीय मनोजने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती, परंतु बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या विनंतीवरून तो रणजीचा चालू हंगाम खेळण्यास तयार झाला होता.

Manoj tiwary Retires From Domestic Cricket

शर्यतीतून बाहेर

रणजीच्या चालू हंगामात बंगाल संघ मनोजच्या नेतृत्त्वाखाली खेळला. मात्र ते आता विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.

Manoj tiwary Retires From Domestic Cricket

क्रीडामंत्री

मनोज सध्या बंगाल राज्याचा क्रीडा राज्यमंत्री आहे. त्याने 2004 मध्ये ईडनमधून प्रथम श्रेणी क्रिकेटला सुरुवात केली होती.

Manoj tiwary Retires From Domestic Cricket

कामगिरी

मनोजच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 30 शतके आणि 45 अर्धशतके आहेत. त्याने 148 सामन्यात 10,195 धावा केल्या आहेत.

Manoj tiwary Retires From Domestic Cricket

आंतरराष्ट्रीय कारकिर्द

मनोजने 12 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने देखील खेळले आहेत ज्यात एक शतक आणि एक अर्धशतक आहे. याशिवाय त्याने तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत.

Manoj tiwary Retires From Domestic Cricket

खदखद

देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मनोजन टीम इंडियाचा माजी कर्णधार धोनीला अनेक प्रश्न करत संघातून डावलल्याची खदखद व्यक्त केली.

Manoj tiwary Retires From Domestic Cricket

जेव्हा मॅक्युलमने ऑस्ट्रेलियाला दिलेला 'बझबॉल'चा दणका

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Brendon McCullum | X/ICC
अधिक पाहाण्यासाठी...