जेव्हा मॅक्युलमने ऑस्ट्रेलियाला दिलेला 'बझबॉल'चा दणका

Pranali Kodre

निवृत्तीच्या कसोटीत मॅक्युलमचा विश्वविक्रम

न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा इंग्लंडचा कसोटी प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमच्या नावावर एक विश्वविक्रम आहे, जो त्याने त्याच्या निवृत्तीच्या कसोटी सामन्यात केला होता.

Brendon McCullum | X/ICC

अखेरचा सामना

मॅक्युलमने 20 ते 24 फेब्रुवारी 2016 दरम्यान ख्राईस्टचर्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध न्यूझीलंडकडून अखेरचा कसोटी सामना खेळला होता.

Brendon McCullum | X/ICC

सर्वात जलद शतक

मॅक्युलम अवघ्या 54 चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले होते. त्यामुळे तो कसोटीत सर्वात कमी चेंडूत शतक करणारा खेळाडू ठरला होता.

Brendon McCullum | X/ICC

मॅक्युलमची शतकी खेळी

मॅक्युलमने न्यूझीलंडकडून पहिल्या डावात 79 चेंडूत 145 धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने 21 चौकार आणि 6 षटकार मारले होते.

Brendon McCullum | X/ICC

विव रिचर्ड्स आणि मिस्बाहचा मोडला विक्रम

त्यावेळी मॅक्युलमने वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू विव रिचर्ड्स आणि मिस्बाह उल हक यांचा विक्रम मोडला होता. विव रिचर्ड्स यांनी 1986 साली इंग्लंडविरुद्ध, तर मिस्बाहने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2014 मध्ये कसोटीत 56 चेंडूत शतक केल होते.

Brendon McCullum | X/ICC

जीवदानाचा घेतला फायदा

विशेष म्हणजे मॅक्युलमने केलेल्या या जलद शतकावेळी त्याचा 39 धावांवर ऑस्ट्रेलियाने झेल घेतला होता, परंतु, तो चेंडू नो-बॉल असल्याने त्याला जीवदान मिळाले होते.

Brendon McCullum | X/ICC

ऑस्ट्रेलियाचा विजय

मात्र, ऑस्ट्रेलियाने नंतर शानदार पुनरागमन करत न्यूझीलंडविरुद्धच्या हा सामना 7 विकेट्सने जिंकला होता.

Brendon McCullum - David Warner | X/ICC

कार्तिक आर्यनच्या परफॉर्मन्सने रंगणार WPL 2024 चा उद्घाटन सोहळा

Kartik Aaryan | Instagram
आणखी बघण्यासाठी