Sameer Amunekar
महिंद्रानं वीरो सीएनजी लाँच केली आहे. नवीन फीचर्ससह वीरो सीएनजी लाँच करण्यात आलीय.
महिंद्र वीरो सीएनजी १९.२ किमी/किलो मायलेज देतं. सीएनजी टँक व्यतिरिक्त, त्यात ४.५-लिटर पेट्रोल टँक देखील आहे.
१५० लिटर सीएनजी टँक ४८० किमीची रेंज देतं असून पेट्रोल टँकसह, वीरो ५०० किमीपेक्षा जास्त मायलेज देण्यास सक्षम आहे.
महिंद्रा वीरोची कार्गो क्षमता १.४ टन आणि कार्गो लांबी ३,०३५ मिमी आहे.
वीरो सीएनजीमध्ये ड्रायव्हर-साइड एअरबॅग, उच्च-शक्तीचे स्टील, फॉल्स स्टार्ट अवॉइडन्स सिस्टम यासारख्या वैशिष्ट्यांसह AIS096 क्रॅश टेस्ट सेफ्टी सर्टिफिकेट आहे.
महिंद्रा वीरोचे दोन ट्रिम्स आहेत यात १.४ XXL SD V2 CNG आणि १.४ XXL SD V4 (A) CNG चा समावेश आहे. ज्यांची किंमत अनुक्रमे ₹८.९९ लाख आणि ९.३९ लाख आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.