Sameer Amunekar
कोरियन मुलींसारखी नितळ आणि 'ग्लास स्किन' मिळवण्याची तुमची इच्छा आहे का? यासाठी महागड्या पार्लर ट्रीटमेंटची गरज नाही, घरच्या घरी एक सोपा उपाय करून पाहा!
ही खास नाईट क्रीम बनवण्यासाठी तुम्हाला फक्त ३ नैसर्गिक गोष्टी लागतील: २ चमचे कोरफड जेल, २ चमचे तांदळाचे पाणी (किंवा तांदळाची पेस्ट) आणि १ व्हिटॅमिन ई कॅप्सूल.
एका स्वच्छ बाऊलमध्ये कोरफड जेल आणि तांदळाचे पाणी घ्या. त्यात व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल फोडून टाका आणि हे मिश्रण क्रिमी (जाडसर) होईपर्यंत चांगले एकजीव करा.
रात्री झोपण्यापूर्वी तुमचा चेहरा फेसवॉशने स्वच्छ धुवून कोरडा करा. त्यानंतर ही तयार केलेली क्रीम चेहऱ्यावर आणि मानेवर लावून हलक्या हाताने ५ मिनिटे मसाज करा.
मसाज केल्यानंतर ही क्रीम रात्रभर चेहऱ्यावर तशीच राहू द्या. रात्रीच्या वेळी त्वचा रिपेअर होत असते, त्यामुळे या क्रीममधील घटक त्वचेत खोलवर मुरतात.
तांदळामुळे त्वचेचा रंग उजळतो आणि डाग कमी होतात, तर कोरफड आणि व्हिटॅमिन ई मुळे त्वचेला पुरेसा ओलावा मिळून त्वचा मऊ आणि चमकदार बनते.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवा. तुम्हाला पहिल्याच वापरात (२४ तासांत) चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो आलेला दिसेल. नियमित वापराने तुमची त्वचा नक्कीच 'ग्लास स्किन' बनेल!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.