Sameer Amunekar
गालांना नैसर्गिक गुलाबी आणि तजेलदार लुक देण्यासाठी घरगुती उपायांचा वापर केला जातो. त्यापैकी बीटरूटच्या पानांची पेस्ट हा एक पर्याय मानला जातो.
ताजी, स्वच्छ बीटरूटची पाने घेऊन ती पाण्याने चांगली धुवा. त्यानंतर बारीक वाटून त्याची पेस्ट तयार करा.
तयार केलेली पेस्ट स्वच्छ चेहऱ्यावर, विशेषतः गालांवर हलक्या हाताने लावा. डोळ्यांच्या आसपासचा भाग टाळा.
पेस्ट साधारण 10-15 मिनिटे चेहऱ्यावर ठेवून नंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
हा घरगुती उपाय करायचा असल्यास आठवड्यातून दोन वेळा वापरता येतो. मात्र प्रत्येकाच्या त्वचेचा प्रकार वेगळा असल्याने परिणामही वेगवेगळे असू शकतात.
नैसर्गिक घटकांमुळेही काही जणांच्या त्वचेवर जळजळ किंवा अॅलर्जी होऊ शकते. त्यामुळे चेहऱ्यावर लावण्यापूर्वी हाताच्या छोट्या भागावर पॅच टेस्ट करणे योग्य ठरते.
फक्त पेस्ट लावण्यापेक्षा पुरेसे पाणी पिणे, संतुलित आहार, नियमित झोप आणि योग्य मॉइश्चरायझर वापरणेही त्वचेच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.