Sameer Amunekar
गोवा म्हटलं की समुद्रकिनारे, नाईटलाइफ आणि पर्यटनाची धमाल आठवते.
पण गोव्यापासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर एक शांत, हिरवेगार आणि ऐतिहासिक महत्त्व असलेले ठिकाण आहे ते म्हणजे पन्हाळा हिल स्टेशन.
कोल्हापूर जिल्ह्यात वसलेलं हे छोटंसं पण निसर्गरम्य हिल स्टेशन, इतिहासप्रेमी, ट्रेकिंगप्रेमी आणि निसर्गप्रेमी पर्यटकांसाठी एक परिपूर्ण ठिकाण ठरतं.
पन्हाळा समुद्रसपाटीपासून सुमारे ३,१७७ फूट उंचीवर असून, इथलं हवामान वर्षभर आल्हाददायक असतं.
विशेषतः पावसाळ्यात आणि हिवाळ्यात इथे धुके आणि हिरवळ यांचा अप्रतिम मिलाफ पाहायला मिळतो.
पन्हाळ्याच्या घाटातून कोसळणारे पाण्याचे लहान लहान झरे, धुक्याने झाकलेली झाडं आणि गार वारा हे पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.