Sameer Panditrao
अवकाशात सध्या असलेल्या उपग्रहांचा बाह्य धोक्यांपासून बचाव करण्यासाठी त्यांची सुरक्षा मजबूत करण्याची योजना भारत आखत आहे.
केंद्र सरकार संरक्षक (बॉडीगार्ड उपग्रह) तयार करण्याची तयारी करत आहे .हे उपग्रह भारतीय उपग्रहांचे संरक्षण करतील आणि संशयास्पद हालचालींना त्वरित प्रतिसाद देतील.
शेजारील देशाचा उपग्रह भारताच्या उपग्रहाच्या एक किलोमीटर एवढा जवळ आल्याची घटना २०२४ मध्ये अवकाशात घडली होती.
‘इस्रो’च्या हा उपग्रह ५००-६०० किलोमीटर उंचीवर होता.
दोन उपग्रहांची टक्कर झाली नाही. पण शेजारील देशाचा उपग्रह अत्यंत जवळ येणे हा केवळ योगायोग नसून शक्तिप्रदर्शनाचा एक मार्ग होता.
सरकार आता ‘एलआयडीएआर’ (लिडार) उपग्रह आणि जमिनीवर आधारित रडार सारख्या प्रणालींवर स्टार्टअपबरोबर काम करीत आहे.
हे उपग्रह वेळेत धोके ओळखू शकतात आणि उपग्रहांना सुरक्षित ठिकाणी हलवू शकतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.