दक्षिण आफ्रिकेत धोनीब्रिगेडनंतर केवळ रोहितसेनेलाच जमला 'हा' पराक्रम

Pranali Kodre

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना केपटाऊनला पार पडला. या सामन्यात भारताने दुसऱ्याच दिवशी म्हणजे 4 जानेवारी 2024 रोजी 7 विकेट्सने विजय मिळवला.

Dean Elgar - Rohit Sharma | PTI

मालिकेत बरोबरी

या विजयासह रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

Dean Elgar - Virat Kohli | PTI

दुसरीच वेळ

दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिकेत बरोबरी साधण्याची भारताची ही दुसरीच वेळ आहे. यापूर्वी 2010-11 साली झालेल्या कसोटी मालिकेत एमएस धोनीच्या नेतृत्वातील भारतीय संघाने 1-1 अशी बरोबरी साधली होती.

South Africa vs India | PTI

नववी कसोटी मालिका

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दक्षिण आफ्रिकेतील भारताची ही नववी कसोटी मालिका होती.

Shubman Gill | PTI

मालिका विजयाची प्रतिक्षा

आत्तापर्यंत झालेल्या नऊही कसोटी मालिकेत भारताने विजय मिळलेला नाही.

Team India | PTI

7 मालिकेत पराभव

या नऊ मालिकांपैकी 7 मालिकांमध्ये दक्षिण आफ्रिकाने विजय मिळवला आहे, तर दोनदाच या दोन संघातील मालिका बरोबरीत सुटली आहे.

Rohit Sharma - Dean Elgar | PTI

वर्षे

साल 1992-93, 1996-97, 2001-02, 2006-07, 2013-14, 2017-18 आणि 2021-22 या वर्षात भारताला दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिकेत पराभव स्विकारावा लागला होता. तसेच 2010-11 आणि आता 2023-24 साली झालेली कसोटी मालिका बरोबरीत सुटली.

Graeme Smith - MS Dhoni | X

डीन एल्गारला निवृत्तीनंतर विराट-रोहितकडून स्पेशल गिफ्ट

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rohit Sharma, Virat Kohli, Dean Elgar | X
आणखी बघण्यासाठी