डीन एल्गारला निवृत्तीनंतर विराट-रोहितकडून स्पेशल गिफ्ट

Pranali Kodre

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना केपटाऊनला पार पडला. या सामन्यात भारताने दुसऱ्याच दिवशी म्हणजे 4 जानेवारी 2024 रोजी 7 विकेट्सने विजय मिळवला.

Team India | PTI

मालिकेत बरोबर

या विजयासह भारताने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. दरम्यान, हा सामना दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू डीन एल्गारचा अखेरचा सामना ठरला.

Rohit Sharma - Dean Elgar | PTI

एल्गारची निवृत्ती

केपटाऊनमधील सामन्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

Dean Elgar | PTI

कर्णधारपद

विशेष म्हणजे अखेरच्या सामन्यात एल्गारने नियमित कर्णधार तेंबा बाऊमाच्या अनुपस्थितीत दक्षिण आफ्रिका संघाचे कर्णधारपदही सांभाळले.

Dean Elgar - Rohit Sharma | PTI

भेट

दरम्यान, भारताने सामना जिंकल्यानंतर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी खिलाडूवृत्ती दाखवत भारतीय संघाकडून त्याला स्वाक्षरी केलेली जर्सीही भेट म्हणून दिली.

Dean Elgar - Rohit Sharma | PTI

फोटो

ही भेट देत असतानाचे फोटोही बीसीसीआयने शेअर केले आहेत.

Dean Elgar - Virat Kohli | PTI

अभिनंदन

इतकेच नाही, तर जेव्हा एल्गार केपटाऊन कसोटीतील दुसऱ्या डावात बाद होऊन परत जात होता, तेव्हा भारतीय संघाने त्याचे अभिनंदनही केले.

Dean Elgar - Mukesh Kumar | PTI

खिलाडूवृत्तीचे कौतुक

त्यामुळे सध्या भारतीय संघाचे त्यांच्या खिलाडूवृत्तीबद्दल कौतुक होत आहे.

Dean Elgar - Virat Kohli | PTI

कामगिरी

एल्गारने 12 वर्षे दक्षिण आफ्रिकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. त्याने 86 कसोटी सामन्यात 37.92 च्या सरासरीने आणि 14 शतके व 23 अर्धशतकांसह 5347 धावा केल्या आहेत. त्याने 8 वनडे सामनेही खेळले, ज्यात 104 धावा केल्या आहेत. तसेच त्याने कसोटीत 14 विकेट्सही घेतल्या आहेत.

Dean Elgar | PTI

नेतृत्व

एल्गारने 18 कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करताना 9 सामने जिंकले आणि 8 सामने पराभूत झाले, त्याचबरोबर 1 सामना अनिर्णित राहिला आहे.

Dean Elgar | PTI

भारत केपटाऊनमध्ये कसोटी विजय मिळवणारा पहिलाच आशियाई संघ

Team India | PTI