Sameer Panditrao
बहुतेक लोक दात रोज दोन वेळा घासतात, पण ब्रश बदलण्याकडे दुर्लक्ष करतात. योग्य वेळ न कळल्याने तोंडाच्या आजारांना आमंत्रण मिळतं.
अमेरिकन डेंटल असोसिएशननुसार, प्रत्येक 2 महिन्यांनी ब्रश बदलावा. ब्रशच्या तारा झिजल्या की तो जंतूंचं घर बनतो.
जुन्या ब्रशमध्ये जीवाणू, बुरशी आणि विषाणू वाढतात. त्यामुळे तोंडाची दुर्गंधी, हिरड्यांचे आजार आणि दातांची झीज वाढते.
सर्दी, ताप, तोंडातील संसर्ग झाल्यावर जुन्या ब्रशवर जंतू राहतात. बरे झाल्यावर नवीन ब्रश वापरणं गरजेचं आहे.
लहान मुलं जोरात दात घासतात. त्यामुळे त्यांचा ब्रश दर २ महिन्यांनी बदलावा. झिजलेल्या ब्रशने दातांना इजा होऊ शकते.
वापरून झाल्यावर ब्रश कोरड्या जागी ठेवा, इतरांच्या ब्रशला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्या, दर आठवड्याला कोमट पाण्याने ब्रश स्वच्छ धुवा,
ब्रश योग्य काळजी आणि वेळेवर बदल केल्यास दात आणि हिरड्यांचं आरोग्य दीर्घकाळ टिकेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.