Sameer Panditrao
आपण रोज कपडे घालतो, पण एकच ड्रेस कितीवेळा घालावा? घेऊया माहिती.
आपण रोज ऑफिस, कॉलेज या कारणाने कपडे घालतो.
आपण मर्यादित कपडे वापरत असल्याने ते वेळेवर धुणे गरजेचे असतात.
कपडे थेट शरीराला लागतात, त्यामुळे घाम, त्वचेतील तेल आणि जंतू सहज चिकटतात.
यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. उन्हाळा आणि प्रवासात जास्त काळजी घ्यावी.
अंगावरील कपडे जास्तीत जास्त दोन वेळा वापरून झाल्यावर धुवावे.
स्वच्छ कपडे घालणे म्हणजे स्वतःचा आणि इतरांचा सन्मान राखणे.