Manish Jadhav
गोव्यातील गडकिल्ल्यांचा इतिहास खूप रंजक आहे. आज आपण शापोराच्या किल्ल्याबद्दल जाणून घेणार आहोत.
उत्तर गोवा जिल्ह्यातील बार्देश तालुक्यात हा किल्ला आहे. गोव्यातील लोकप्रिय किल्ल्यांपैकी एक शापोरा किल्ला आहे.
पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला. शत्रूंना धाकात ठेवण्यासाठी पोर्तुगिजांनी 1617 मध्ये निर्माण कार्य सुरु केले होते.
1684 मधे मराठ्यांनी हा किल्ला ताब्यात घेतला होता. पुढे परत पोर्तुगीजांनी तो आपल्या ताब्यात घेतला. मात्र 1882 मध्ये पोर्तुगीजांनी या किल्ल्याचा वापर कायमचाच बंद केला होता.
किल्ला आज अवशेषरुपात शिल्लक आहे, मात्र अजूनही किल्ल्याची सर्व बाजूने असणारी भक्कम तटबंदी, पोर्तुगीज शैलीचे बुरुज आणि सुस्थितीत असणारा दरवाजा आजही पाहण्यासारखा आहे.
शोपाराच्या किल्ल्यावरुन समुद्राचे सुंदर रुप तुम्हाला अनुभवता येते.
‘दिल चाहता है’ या चित्रपटातील एका दृश्यात हा किल्ला आपल्याला पाहायला मिळतो. या चित्रपटापासून हा किल्ला अधिकच प्रसिद्धीस आला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.